Cyber Fraud Pune Update : पुण्यात गुन्हेगारीचा उच्छाद; सायबर फसवणूक, दागिने चोरी आणि टोळक्यांची दहशत

गुंतवणूक व गॅस अपडेटच्या आमिषाने लाखोंची लूट, महिलांचे दागिने हिसकावले; ‘ओन्ली किंग ऑफ पुणे’ म्हणणाऱ्या टोळीवर पोलिसांची कारवाई

पुणे – Cyber Fraud Pune Update : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची १ कोटी ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४५ वर्षीय तक्रारदाराने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Nomadic Tribes : राज्यातील भटक्या विमुक्तांना सामाजिक, आर्थिक स्थैर्य मिळावे: उद्धव काळे

Cyber Fraud Pune Updateपाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात तक्रारदारांशी संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांनी त्यांना समाजमाध्यमातील एका समुहात सहभागी करुन घेतले. तक्रारदाराने पैसे गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले. प्रत्यक्षात परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

ज्येष्ठ नागरिकाची ६ लाखाांची फसवणूक

Cyber Fraud Pune Update गॅस देयक अद्ययावत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदाराच्या सोसायटी पाईपद्वारे गॅस पुरवठा होता. गॅस देयक अद्ययावत (अपडेट) करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बंँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी खात्यातून सहा लाख रुपये काढून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे तपास करत आहेत.

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले; मंडई, शिवाजीनगर, कर्वेनगर परिसरात धुडगूस

पुणे- Cyber Fraud Pune Update : शहरातील विविध भागात चोरट्यांनी धुडगूस घातला असून, पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. या घटना मंडई, शिवाजीनगर, कर्वेनगर परिसरात घडल्या आहेत. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी शांत झालेली चोरट्यांची टोळी पुन्हा एकदा कार्यरत झाल्याचे घटनांवरून स्पष्ट झाले आहे.

खरेदीसाठी मंडईतील तुळशीबाग गणपती जवळ थांबलेल्या एका ३५ वर्षीय महिलेच्या बॅगेतून चोरट्यांनी ५२ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना ४ एप्रिलला संध्याकाळी सहाच्या सुमारास गुप्ता बॅग हाउसमध्ये घडली आहे. याप्रकरणी सोलापूरमध्ये राहणार्‍या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार सुरवसे तपास करीत आहेत. Cyber Fraud Pune

पदपथाजवळील झाडाची फुले तोडत असलेल्या महिलेजवळ येउन दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख ३४ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना ४ एप्रिलला सकाळी सहाच्या सुमारास शिवाजीनगरमधील पै क्लिनीक व रशरन्स ट्रेडर्सच्या समोर घडली आहे. याप्रकरणी यशोधन अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या ५३ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. परिसरातील सीसीटीव्हींचे फुटेज तपासले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अमलदार पवार तपास करीत आहेत.Cyber Fraud Pune

पादचारी जेष्ठेचे मंगळसूत्र हिसकावले

Cyber Fraud Pune Update: दुचाकीस्वार चोरट्यांनी पायी चाललेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील ५० हजार रूपयांचा नेकलेस हिसकावून नेला आहे. ही घटना ४ एप्रिलला सकाळी सव्वा सातच्य सुमारास अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवसह्याद्री सहकारी गृहरचना संस्था मर्यादित सोसायटी, पटवर्धन रोडजवळ घडली आहे. याप्रकरणी कर्वेनगरात राहणार्‍या ६० वर्षीय महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करीत आहेत.

ओन्ली किंग ऑफ पुणे म्हणत काढली रॅली; पोलिसांनी गुडघ्यावर धिंड काढून उतरवली टोळीची मस्ती

पुणे – Cyber Fraud Pune Update : ओन्ली किंग ऑफ पुणे म्हणत रॅली काढून सोशल मीडियावर रिल्स व्हायरल करणार्‍या तडीपारासह टोळीला खराडी पोलिसांनी अद्दल घडवली आहे. संबंधित आरोपींना अटक करून पोलिसांनी त्यांची गुडघ्यावर चालवून धिंड काढली आहे. त्यानंतर त्यांचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल करीत पोलिसांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. निखील मधुकर कांबळे वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) सुरेश रुपेश गायकवाड ( वय २३), अनुज नितीन मोरे (वय २२) ओमकार अनिल चावरे (वय २४) यांना अटक केली आहे. तसेच इतर ८ ते १० साथीदाराविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

Cyber Fraud Pune

लक्ष्मीनगर, येरवडा येथील रेकॉर्डवरील तडीपार आरोपी निखील मधुकर कांबळे (वय २३) याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र, आदेशाचे उल्लंघन करत त्याने दि. २८ मार्चला सायंकाळी सहा ते दहा वाजण्याच्या सुमारास खराडीतील रक्षक नगर गोल्ड सोसायटी परिसरात साथीदारांसह बेकायदेशीर जमाव जमवला. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी रॅली काढत त्याचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रसारित केले. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. त्यानुसार पोलिसांनी क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायद्यानुसार कारवाई केली आहे. अटक केलेल्या आरोपींना त्यांनी ज्या परिसरात बेकायदेशीर जमाव जमवला होता, त्याच ठिकाणी नेऊन स्थानिक नागरिकांसमोर त्यांची धिंड काढली. Cyber Fraud Pune Update

Pune crime.. : पुण्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण; चोरी, मारहाण, बालविवाह आणि फरार गुंड अटकेत

Cyber Fraud Pune Update ओन्ली किंग ऑफ पुणे म्हणत सराईतासह टोळक्याने दुचाकीवर रॅली काढली. त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. भविष्यात दहशत निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना आळा बसणार आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या सूचनेनुसार, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, उपनिरीक्षक राहुल कोळपे, महिला उपनिरीक्षक विशाखा म्हेत्रे, श्रीकांत शेंडे, दत्तात्रय खरपुडे, महेश नाणेकर, सुरेंद्र साबळे, साहेबराव गुंडाळे, श्रीकांत कोद्रे, विकास केदार, उज्ज्वल थोरात यांनी केली.

तडीपार असतानाही आरोपीने साथीदारांच्या मदतीने दुचाकीवर रॅली काढून व्हिडिओ व्हायरल केले होते. याप्रकरणी आम्ही तत्काळ कारवाई करीत संबंधित टोळीविरूद्ध कारवाई करीत अटक केली आहे. Cyber Fraud Pune Update

संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस ठाणे

Leave a Comment