cyber fraud Update Pune : पुण्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख; अपघातात मृत्यू, सायबर फसवणूक आणि पिस्तूलासह सराईत जेरबंद

उरळी देवाची येथे मद्यधुंद चालकाकडून तरुणाचा मृत्यू; खराडीत शेअर मार्केट गुंतवणुकीत १७ लाखांची फसवणूक; स्वारगेट परिसरात देशी पिस्तूलासह आरोपी अटकेत

पुणे – cyber fraud Update Pune : दारूच्या नशेत भरधाव मोटार तरूणाच्या अंगावर चढवून त्याला काही अंतर फरफटत नेले. त्यानंतर त्याच्या अंगावरून गाडी चालवून तरूणाला गंभीर जखमी केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मद्यपी वाहन चालकाला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात १२ एप्रिलला रात्री साडेबाराच्या सुमारास हडपसर सासवड रस्त्यावरील मामा भाजे हॉटेल समोर उरळी देवाची याठिकाणी घडला आहे.

Pune crime Batami : पुण्यात वैमनस्यातून हल्ले; एकाचा खून, दोघांवर जीवघेणा वार

सागर बाळासाहेब सायकर (वय ४१, रा. शेवाळवाडी ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा गोपाळ कोईलवाड (वय ३०, रा. फुरसुंगी ) याला अटक करण्यात आली आहे. विजय तानाजी शिर्वेâ (वय ४१ रा. सातववाडी, हडपसर ) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. cyber fraud Update Pune

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा कोईलवाड हा १२ एप्रिलला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मद्यपान करून वाहन चालवित होता. त्यावेळी त्याने उरळी देवाची परिसरात सागर सायकर याला मोटारीची धडक देउन बोनटवर पाडले. त्यानंतर त्याने सागरला काही अंतर फरफटत नेउन खाली पाडले. त्यानंतर त्याच्या अंगावरून मोटार चालवून सागरच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी आरोपी कृष्णाला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक कोमल जाधव तपास करीत आहेत.

तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १७ लाखांना

पुणे – cyber fraud Update Pune : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल १७ लाख २३ रूपयांची फसवणूक केली आहे. ही घटना २ डिसेंबर ते २६ जानेवारी २०२६ कालावधीत खराडीत घडली आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय तरूणाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंक धारकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. cyber fraud Pune

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण खराडीत राहायला असून, २ डिसेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉटसअ‍ॅपद्वारे लिंक पाठवली. गुु्रपमध्ये अ‍ॅड करून घेत त्यांना अ‍ॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याद्वारे नफा दर्शवून सायबर चोरट्यांनी संबंधित तरूणाला गुंतवणूक करण्यास सांगितले. तब्बल १७ लाख २३ हजार रूपयांची गुंतवणूक केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास करीत आहेत.

पिस्तूल बाळगणार्‍या सराईताला पकडले; स्वारगेट पोलिसांची कामगिरी

पुणे- cyber fraud Update Pune : पिस्तूल बाळगून फिरणार्‍या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझीनमधील दोन काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. विनोद चंदर शिंदे (वय ३१ रा. बुरूडगाव, अहिल्यानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध भारतीय हत्यार व कलमासह महाराष्ट्र पोलीस कायदा व कलमानुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने स्वारगेट पोलीस १० एप्रिलला सकाळच्या सुमारास एसटी स्टॅडसह सारसबाग परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी तपास पथकातील अमलदार सागर केकाण आणि सुजय पवार यांना पिस्तूल बाळगणार्‍या सराईताची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने आदमबाग परिसरात विनोद शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल, दोन काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक विकास भारमळ, एपीआय अभिजीत पाटील, सागर केकाण, शिंदे, मोराळे, टोणपे यांनी केली. cyber fraud Update Pune

Leave a Comment