Maharashtra crime : पुण्यात कायदा-सुव्यवस्थेला तडा; पोलीस शिपायाला धक्काबुक्की, बँकेत गोंधळ, तरुणाला कोयत्याच्या धाकाने लूट

अरण्येश्वर, भवानी पेठ आणि नऱ्हे परिसरातील तीन वेगवेगळ्या घटनांत गुन्हे दाखल; मारहाण, धमक्या व जवळपास चार लाखांची रोकड लंपास

पुणे – Maharashtra crime : रस्त्यावर फटाके फोडण्यास मज्जाव करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला टोळक्याने धक्काबु्क्की केल्याची घटना अरण्येश्वर परिसरात घडली. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला. याप्रकरणी शरद क्षीरसागर, ओंकार सूर्यवंशी, नयन कांबळे, सागर लोंढे, कुणाल लोंढे (रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर, सहकारनगर) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई राहुल उन्हाळे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

UMED Maharashtra : ‘उमेद’ रणरागिणींची प्रेरणादायी यशकथा; जिद्द, कौशल्य आणि मार्गदर्शनातून पुण्यातील महिलांचे स्वावलंबन

 Maharashtra crime पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आरोपींनी अरण्येश्वर परिसरात फटाके फोडले. रात्रपाळीत गस्त घालणारे पोलीस शिपाई उन्हाळे यांनी त्यांना हटकले. रस्त्यात फटाके फोडू नका, तसेच मधोमध लावलेली दुचाकी बाजूला काढा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आरोपींनी उन्हाळे यांना धक्काबुक्की केली. झटापटीत उन्हाळे यांचा गणवेश फाटला. शासकीय कामात अडथळा आणणे, धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कोपनर तपास करत आहेत.

बँकेत गोंधळ घालून व्यवस्थापकाला शिवीगाळ

पुणे – Maharashtra crime बँकेत गोंधळ घालून कर्मचारी, तसेच व्यवस्थापाकाला शिवीगाळ करण्यात आल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. या प्रकरणी खडक पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी राहुल राजू वाघरेशा (वय २८), राजू वाघरेशा (वय ५८, दोघे रा. गोमराज व्हिला, गुलटेकडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बँक व्यवस्थापक श्रीआंश श्रीदेव सिंग (वय ३९, रा. राॅयल एनरिच सोसायटी, भोसले गार्डन, हडपसर ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra crime पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भवानी पेठेतील कल्पतरु प्लाझा येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत व्यवस्थापक आहेत. आरोपी सोमवारी (१३ एप्रिल) दुपारी दी़डच्या सुमारास बँकेत आले. बँकेतील कर्मचाऱ्यांना त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी हे बँक व्यवस्थापक सिंग यांच्या दालनात शिरुन त्यांना मारण्याच्या प्रयत्नात होते. सिंग यांनी या घटनेची माहिती बँकेतील सुरक्षारक्षक सोमनाथ जगताप यांना दिली. आरोपींनी सुुरक्षारक्षक जगताप यांना धक्काबुक्की करुन जिवे मारण्याची धमकी दिली, असे सिंग यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करत आहेत. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. Maharashtra crime

बाह्यवळण मार्गावर तरुणाला धमकावून रोकड लुटली

पुणे-मद्य विक्री दुकानात काम करणाऱ्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून चार लाख रुपयांची रोकड लुटून नेण्यात आल्याची घटना मुंबई – बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. Maharashtra crime याबाबत रोहन रवींद्र कांबळे (वय ३१, रा. इंदू निवास, काळेवाडी,पिंपरी-चिंचवड ) याने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरटा आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन एका मद्य विक्री दुकानात कामाला आहे. मद्य विक्री दुकानात जमा झालेली तीन लाख ९९ हजार रुपयांची रोकड घेऊन तो १२ एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास मालकांच्या घरी देण्यासाठी निघाला होता.मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात दुचाकीस्वार कांबळे याला दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अडवले. त्याला कोयत्याचा धाक दाखविला. त्याला जिवे मारण्याची धमकी देऊन ३ लाख ९९ हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून चोरटे पसार झाले. या घटनेनंतर कांबळेने पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी बाह्यवळण मार्गावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक लिटे तपास करत आहेत. Maharashtra crime

Leave a Comment