बीडमध्ये शेतकऱ्यांच्या मोटर-वायर चोरी प्रकरणी आरोपी अटकेत, तर पुणे ग्रामीणच्या शिरुरमध्ये २१ लाखांचा मेफेड्रोनसह तिघांना बेड्या
बीड – Beed crime news : शेतकऱ्यांचे मोटर आणि वायर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे बीड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तलावात व नदीमध्ये टाकलेल्या मोटारींचे वायर चोरीच्या घटना बीड, परभणी व जालना जिल्हयात सातत्याने सुरु होत्या. घटनांची माहिती मिळताच बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक नवनीत कॅावत यांनी गांभिर्याने दखल घेतली.
Pune corruption case : पुण्यात खळबळ! भ्रष्टाचार आणि कोट्यवधींच्या फसवणुकीने उडाली खळबळ
धमेंद्र सुक्कल पारधी वय-२५ वर्षे रा,विलेगे बुठा पो.स्ट, सुगावन जि. कटनी राज्य मध्यप्रदेश २) शेख शफीक शेख बाबु वय-२५ वर्षे रा. माजलगाव जि.बीड यांना अटक केली आहे. त्यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव ,केज येथील वेगवेगळ्या ठिकाणावरील नदी व तलावामधुन त्याच्या इतर आठ साथिदारांच्या मदतीने वायर चोरी केले असल्याची कबुली दिली. Beed crime news
आरोपी निष्पन्न करुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना देण्यात आले होते. वायर चोरीच्या सर्व घटनास्थळांना पोलीस उपनिरीक्षक विघ्ने यांच्या पथकाने भेट दिली. आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. चोरी करणाऱ्या आरोपी बाबत माहीती घेत असताना पोउपनि विघ्ने यांच्या पथकाला खबर्यामार्फत गोपनिय माहीती मिळाली की मध्यप्रदेश राज्यातील काही चोरट्ये हे रुद्राक्ष विकण्याच्या बाहाण्याने गावोगाव रेकी करत फिरत आहेत. रात्रीचे वेळी रेकी केलेल्या ठिकाणावरुन मोटार वायर चोरी करत आहेत. सध्या चोरटे हे नांदगाव जिल्हा नाशिक येथे राहण्यास आहेत. माहिती मिळताचा कोणतीही दिरंगाई न करता पो.नि शिवाजी बंटेवाड यांनी पथक नांदगावचे दिशेने रवाना केले. पथकाने नांदगाव येथे जाऊन संशईत इसमांचा शोध घेऊन तीन जणांना ताब्यात घेतले आहे. Beed crime news
आरोपीची झाडाझडती घेतली असता त्याच्या ताब्यातुन गुन्हा करते वेळी वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकल आणि दीड।लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीना माजलगाव व केज उपविभागातील एकुण ०६ गुन्हे केल्याची स्थानिक गुन्हे शाखेसमोर कबुली दिली आहे. याप्रकरणातील तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी केज पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणातील उर्वरित ८ फरार आरोपींचा व चोरी केलेल्या मुद्येमालाचा स्थानिक गुन्हे शाखा आणि केज पोलीस कसोशीने शोध घेत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, हवालदार महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गित्ते, बप्पासाहेब घोडके, गणेश मराडे यांनी केली आहे. Beed crime news
शिरुरमध्ये मेफेड्रोन जप्त तिघे अटकेत; मेफेड्रोनसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
मेफेड्रोन (एमडी) विक्री प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिघांना अटक केली. शिरुर परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून ४७.६० मेफेड्रोन, दोन मोटारी, अन्य साहित्य असा २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशाल मारुती मोरे (वय २०, रा. बाफनामळा, शिरुर, जि. पुणे), प्रतीक संतोष लंघे (वय २५, रा. करडे, ता. शिरुर, जि. पुणे), मिथून विजयपाल सिंग (वय २६, रा. सावताामाळीनगर, शिरुर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

‘केंद्र शासनाकडून ‘नशामुक्त भारत अभियान’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत अमली पदार्थ विक्री, तस्कर, पुरवठादारांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक १७ एप्रिलला शिरुर परिसात गस्त घालत होते. त्यावेळी न्हावरे फाटा परिसरातील एका मंगल कार्यालयासमोर दोन मोटारी थांबल्या होत्या. मोटारीतील संशयित मेफेड्रोन विक्रीसाठी आल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मोरे, लंघे, सिंग यांना पकडले’, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्याकडून मेफेड्रोन, दोन मोटारी, तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. Beed crime news
मेफेड्रोन खरेदी ऑनलाइन ॲपद्वारे Beed crime news
अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा आरोपींनी मेफेड्रोन ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले. आरोपींपर्यंत अमली पदार्थ पोहचविणाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. पुरवठादाराचा शोध घेण्यात येत असून, आरोपींचे रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चाेपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक निरीक्षक राहुल गावडे आणि पथकाने ही कारवाई केली. Beed crime news