62 लाख महिलांनी ई-केवाईयसी केलीच नाही
हॅलो जत न्युज नेटवर्क : Ladki Bahin Yojana 2026 : राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बँक ग्राहक ओळख प्रणालीत 81 लाख लाडक्या बहिणी सध्या अपात्र ठरल्या आहेत. यापैकी 62 लाख लाडक्या बहिणींनी E-kyc केलीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेची केवायसी करत असताना कुटुंबाचे उत्पन्न पॅन कार्डद्वारे तपासण्यात आले, या तपासणीत 9 लाख 46 हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरले आहेत.
summer health care : – वाढत्या उन्हात आरोग्याची काळजी कशी घ्याल – विशेष लेख
Ladki Bahin Yojana 2026 च्या 30 एप्रिलच्या केवायसी पडताळणी नंतर 2 कोटी 47 लाख लाभार्थी लाडक्या बहिणींपैकी 81 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरले आहेत. एक कोटी 66 लाख लाडक्या बहिणींची संख्या निश्चित झाली आहे. सरकारने 81 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची एकच झोड उठवली आहे. या अपात्र बहिणी पैकी 62 लाख लाडक्या बहिणींची केवायसी केली नसल्याची बाब उघड झाली आहे. इतक्या मोठ्या संख्याने केवायसी पासून अलिप्त राहिल्याने सरकारला केवायसी पुन्हा सुरू करावी लागेल अशी शक्यता आहे. ही योजना दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली तेव्हापासून सरकारने महिन्याला 1 हजार 200 कोटी या योजनेवर खर्च करत आले आहेत, एप्रिलमध्ये अपात्र ठरलेले 81 लाख लाडक्या बहिणीवर सरकारने आत्तापर्यंत 12 ते 14 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.
16 हजार पुरुषांनीही घेतला लाभ
Ladki Bahin Yojana 2026 या योजनेमध्ये तब्बल 16 हजार पुरुषांनी लाडकी बहीण या योजनेतून बनावट कागदपत्रे सादर करून लाभ मिळवले असल्याचे निदर्शनास आले होते. आता त्यांच्याकडूनही सरकार दिलेली रक्कम वसूल करणार आहे. मात्र अपात्र असलेल्या कोणत्याही महिलांकडून शासन लाभ वसूल करणार नसल्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे आदेश डिसेंबर 2025 मध्ये दिले होते, त्यानंतर टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या पडताळणीत अखेर 81 लाख लाडक्या बहिणी अपात्र आणि 1 कोटी 66 लाख महिला पात्र ठरलेल्या आहेत, यामुळे सरकारच्या तिजोरीवर वर्षाला पडणार 10 ते 12 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा वाचणार आहे. Ladki Bahin Yojana 2026