न्यायालयीन आदेशाचा आधार घेत मिळवून दिला न्याय
पुणे प्रतिनिधी
पुणे – शहरातील येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील ७० वर्षीय महिलेचे दोन विवाहित मुले सांभाळ करत नव्हते. सूनांकडून त्यांना त्रास दिला जात होता. त्याविरुद्ध ज्येष्ठ महिलेने पुणे उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी (दिवाणी न्यायालय) दावा दाखल केला होता. १९ मार्च २०२४ रोजी ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह अधिनियम २००७ आणि २०१० अन्वये आदेश दिले होते. दोन्ही मुले सक्षम असल्याने त्यांनी घर सोडून अन्य ठिकाणी जावे. दोन्ही मुलांनी दरमहा निर्वाह भत्त्यापोटी आईच्या बँक खात्यात तीन हजार रुपये भरावेत, तसेच त्याची माहिती न्यायालयात द्यावी, असे आदेश दिले होते. मात्र न्यायालायाच्या आदेशानंतर ज्येष्ठ महिलेला घराचा ताबा मिळत नव्हता. अखेर वकिलांमार्फत हे प्रकरण पोलसांकडे आल्यानंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चुलुमुला रजनीकांत यांनी न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आणि ज्येष्ठ महिलेला घराचा ताबा दोन वर्षांनी मिळाला.
पुण्यात २२ मार्च रोजी ‘एकल सुर-ताल’ सांस्कृतिक कार्यक्रम -बातमी वाचा
न्यायालायच्या आदेशानंतर गेले दोन वर्ष येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या ७० वर्षीय शांताबाई भाेसले यांना घराचा ताबा मिळाला नव्हता. भोसले यांच्या मार्फत ॲड. भिवसेन रोकडे आणि ॲड. दिलीप कुऱ्हाडे यांनी पोलीस उपायुक्त चुलुमुला रजनीकांत यांची भेट घेतली. न्यायालयाीन आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, असे लेखी पत्र त्यांना दिले. त्यानंतर पोलीस उपायुक्त रजनीकांत यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवीद्र कदम यांना ज्येष्ठ महिलेला घर ताब्यात मिळण्याबाबत कार्यवाही करुन याबाबतचा लेखी अहवाल सादर करण्याची सूचना दिली. कायदेेशीर तरतूद आणि न्यायालयीन आदेशाचा आधार घेऊन पोलीस निरीक्षक कदम यांनी भोसले यांना घराचा ताबा मिळवून दिला.
पुणे पोलिसांच्या भोसले यांना साडीभ भेट दिली. दरमहा त्यांना पोलिसांकडून शिधा दिला जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक कदम यांनी सांगितले. शांताबाई भोसले यांची दोन्ही मुले त्यांचा सांभाळ करत नव्हते. गेले दोन वर्ष त्या स्वत:चे घर ताब्यात घेण्यासाठी संघर्ष करत हाेत्या. हे प्रकरण कौशल्याने हाताळून त्यांना घराचा ताबा मिळवनू दिला. भोसले यांचा सांभाळ, त्यांना दरमहा शिधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पोेलिसांनी घेतली आहे’, असे लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी सांगितले.