Pune Crime News : पुण्यात चोरी आणि बाँम्ब धमकीचे प्रकार; पोलिसांचा तपास सुरू

सदाशिव पेठेत औषध दुकानातून २.८२ लाखांची रोकड चोरी; बाणेर पारपत्र कार्यालयाला ईमेलद्वारे बाँम्ब धमकी

पुणे प्रतिनिधी 

पुणे Pune Crime News : शहरातील सदाशिव पेठेत ओैषध वितरकाच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील २ लाख ८२ हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ओैषध वितरकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News : पुण्यात फसवणूक आणि चोरीचे प्रकार उघड; साडेसात लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिरासमोर तक्रारदार ओैषध वितरकाचे दुकान आहे. गुरुवारी (१९ मार्च) सायंकाळी दुकान बंद करण्यात आले. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील दोन लाख ८२ हजारांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. शुक्रवारी (२० मार्च) सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यात आले. तेव्हा रोकड चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके तपास करत आहेत.

पुण्यात पारपत्र कार्यालयात बाँम्ब ठेवल्याची धमकी

पुणे – Pune Crime News शहरातील बाणेर येथील पारपत्र कार्यालयात बाँम्ब ठेवल्याची धमकी दिल्याची घटना घडली. बाँम्बच्या अफवेमुळे पारपत्र कार्यालयात घबराट उडाली. पारपत्र कार्यालयात ईमेलद्वारे बाँम्बची धमकी देणाऱ्याविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पारपत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ईमेलद्वारे धमकी देणाऱ्या एका विरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील पारपत्र कार्यालयात सायनाईड गॅस असलेले १९ बाँम्ब ठेवण्यात आले आहेत, अशी धमकी देणारा संदेश सौरभ बिश्वास नावाच्या एकाने ईमेलवरुन पाठविला होता. शुक्रवारी (२० मार्च) बाँम्बस्फोट होणार असल्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. घटनास्थळी त्वरीत बाँम्बशोधक नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पारपत्र कार्यालयाची तपासणी करण्यात आली. तेव्हा बाँम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. या घटनेमुळे तासभर पारपत्र कार्यालयातील कामकाज विस्कळीत झाले. सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत. आठवड्यापूर्वी पारपत्र कार्यालायत बाँम्ब ठेवल्याची धमकी देणारा संदेश पाठविण्यात आला होता.

Leave a Comment