सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे व्यावसायिकाचे साडेचार कोटी रुपये परत; कात्रजमध्ये प्रेमसंबंध तुटल्याच्या रागातून तरुणीची हत्या
पुणे – Pune Crime News : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर चोरटे वेगवेगळी आमिषे दाखवून नागरिकांची दररोज लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केली. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे बांधकाम व्यावसायिकाला साडेचार कोटी रुपये परत मिळाले.
Accident Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यावर डंपरची धडक; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
शहरातील एका व्यावसायिकाला बांधकामसाठी पोलाद हवे होते. व्यावसायिकाने संकेतस्थळावर पोलाद विक्री व्यवसायाबाबतची माहिती घेतली. पोलाद पुरवठा करणाऱ्या व्यवासायिकाची माहिती घेत असताना त्यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. राजस्थानातून बोलत असून, पोलाद पुरवठा करण्याचा व्यवसाय असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. पोलाद पुण्यात पाठविण्यासाठी पहिले पैसे पाठवावे लागतील, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर एका मध्यस्थाने दोन बँक खात्याचे क्रमांक व्यावसायिकाला पाठविले. त्यानुसार व्यावसायिकाने बँक खात्यात दोन कोटी २७ लाख रुपेय, तसेच दुसऱ्या बँक खात्यात दोन कोटी २७ लाख रुपये पाठविले. Pune Crime News
चोरट्यांच्या खात्यात व्यावसायिकाने एकूण मिळून चार कोटी ५४ लाख रुपये भरले. चोरट्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केल्यानंतर त्यांनी मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने त्वरीत ऑनलाइन पद्धतीने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांकडे तक्रार झाल्यानंतर सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरु केला. दोन बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. खातेधारकांना याबाबतची माहिती नव्हती. पोलिसांनी बँकेला संबंधित खात्यात जमा झालेली रक्कम अन्य बँक खात्यात वर्ग करु नये, अशी विनंती केली. ज्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आलेे होते. त्या बँक खातेदारांना पैसे व्यावसायिकाच्या खात्यात आरटीजीएस सुविधेद्वारे पैसे पुन्हा जमा करण्यास सांगितले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिली. पोलिसांच्या तत्परतेमुळे व्यावसायिकाचे पैसे मिळाले.व्यावसायिकाने पोलिसांचे मनोमन आभार मानले. Pune Crime News
प्रेमसंबंध तोडल्याने कात्रजमध्ये तरुणीचा खून
पुणे – Pune Crime News
प्रेमसंबंध तोडल्याने एका तरुणीचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा परिसरात घडली. तरुणीचा खून करुन पसार झालेल्या आरोपी तरुणाला आंबेगाव पोलिसांनी अटक केली.
मनीषा खम्म दमाई (वय २५, सध्या रा. आयुषी काॅम्प्लेक्स, पारी कंपनी चौक, नऱ्हे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी प्रकाश अर्जुन तिखात्री (वय ३०, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. ढकारी, जि. आछम, नेपाळ) याला अटक करण्यात आली. याबाबत किशन भरत परिहार (वय ३५, सध्या रा. ओमशांती बिल्डिंग, मानाजीनगर, नऱ्हे, मूळ रा. जि. वाडा, नेपाळ ) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशन परिहार याची मनीषा दमाई बहीण आहे. मनीषा हिचे आरोपी किशन परिहार याच्याशी प्रेमसंबंध होते. किशन, मनीषा आणि आरोपी किशन हे मूळचे नेपाळचे आहेत. ते रखवालदार म्हणून काम करतात. मनीषाचे किशनशी प्रेमसंबंध होते. आरोपी किशन हा काही कामधंदे करत नव्हता. त्यामुळे मनीषाने त्याच्याशी असलेले प्रेमसंबध तोडले. प्रेमसंबंध तोडल्यानंतर आरोपी तिच्यावर चिडला होता.
Pune Crime News :१८ मार्च रोजी किशन हा मनीषाला नऱ्हे परिसरात भेटायला आला. त्याने गोड बोलून मनीषाला मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ नेले. तेथील एका हाॅटेलच्या परिसरात मागील बाजूस दाट झाडी आहे. दाट झाडीत त्याने मनीषाला नेले. तेथे त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. दोरीने गळा आवळून तिचा खून करुन तो पसार झाला. किशन तेथून पसार झाला. दरम्यान, दाट झाडीत एका तरुणी मृतावस्थेत सापडल्याचे उघडकीस आल्यानंतर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट दिली. आंबेगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी यांनी तातडीने तपास सुरू केला. मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीची ओळख पटविण्यात आली. तपासात मिळालेल्या माहितीनंतर आरोपी किशनला ताब्यात घेण्यात आले. Pune Crime News
प्रेमसंबध तोडल्याने मनीषाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपी किशनने पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.