थायलंडहून आलेल्या कार्गोमध्ये चिनी खाद्यपदार्थांच्या नावाखाली तस्करी; कस्टम्सची कारवाई, एक आरोपी अटकेत
पुणे – Pune Airport Hydroponic Ganja Seizure : विमानतळावर पुणे कस्टम्स विभागाने मोठी कारवाई करत तब्बल २६ कोटी ८० लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. ही कारवाई गुरूवारी (दि. २६) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो विभागात करण्यात आली. थायलंडहून पुण्यात आलेल्या एका आयात मालाच्या कंटेनरमध्ये चिनी खाद्यपदार्थ असल्याचे घोषित करण्यात आले होते. ‘मँडरिन ऑरेंज सॅक्स’ या नावाने हा माल पांढऱ्या थर्माकोल बॉक्समध्ये पॅक करण्यात आला होता.
‘मँडरिन ऑरेंज सॅक्स’ या नावाने हा माल पांढऱ्या थर्माकोल बॉक्समध्ये पॅक
Pune Airport Hydroponic Ganja Seizure ; संशय आल्याने कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी स्कॅनिंग केली असता मालाचे स्वरूप नैसर्गिक नसल्याचे लक्षात आले. यानंतर अधिकाऱ्यांनी एक बॉक्स उघडून तपासणी केली असता त्यामध्ये सीलबंद टिनचे डबे आढळले. त्या डब्यांमध्ये मीठासारखा पांढऱ्या रंगाची पावडर होती. त्याची सखोल तपासणी केल्यानंतर त्या पावडरच्या आत व्हॅक्युम सीलबंद प्लास्टिक पॅकमध्ये हायड्रोपोनिक गांजा लपवलेला असल्याचे उघड झाले. यानंतर संपूर्ण मालाची तपासणी करण्यात आली असता ७६.५८ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. भारतीय बाजारात या गांजाची किंमत अंदाजे २६ कोटी ८० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी कस्टम्स विभागाने तात्काळ शोधमोहीम राबवून एका आरोपीला अटक केली आहे. रॅकेटचा आणखी तपास सुरू असून यामागील मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Pune Airport Hydroponic Ganja Seizure