Maharashtra crime update : पुण्यात वाढतेय गुन्हेगारी : धमकीचा प्रकार आणि घरफोडीची घटना उघड

बाणेरमध्ये नगरसेवकावर धमकीचा आरोप; कोथरूडमध्ये साडेपाच लाखांचा ऐवज चोरी, पोलिसांकडून तपास सुरू

पुणे – Maharashtra crime update  : बांधकामाच्या वादातून नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी बाणेर पोलिस ठाण्याबाहेरच एका नागरिकाला धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी संबंधित नगरसेवकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सचिन रघुनाथ चाकणकर (वय ४६, रा. बाणेर) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ramtekdi Police Chowki : गुंडानो सावध रहा; सुधारणा न झाल्यास निघणार पोलीस काढणार तुमची धिंड

 Maharashtra crime update : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या राहत्या जागेवरून चुलत भावांशी मालमत्तेचा वाद सुरू आहे. या वादग्रस्त जागेवर सुरू असलेल्या बांधकामाला महापालिकेने ‘स्टॉप वर्क’ नोटीस दिली होती. त्यानंतरही तेथे बांधकाम सुरूच असल्याने तक्रारदार या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी कुटुंबियांसह पोलिस ठाण्यात गेले होते. दरम्यान, तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव चांदेरे आले. त्यांनी चाकणकर यांच्याशी वाद घालत, ‘माझ्या कार्यकर्त्यांचे काम थांबवतोस का? तुझे घरही पाडून टाकतो, तू कसा जगतोस ते बघतो,’ अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तसेच, नगरसेवकाने आपल्या चालकाला ‘बांबू काढ’ असे सांगत मारहाणीची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.

कोथरूडमध्ये घरफोडी- साडेपाच लाखांचा ऐवज चोरी

पुणे- Maharashtra crime update : सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा पाच लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पौड रस्ता भागातील धनश्री सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदार आणि कुटुंबीय सदनिका बंद करुन १ मार्च रोजी बाहेर गेले होते. चोरट्यांनी मध्यरात्री सदनिकेच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा पाच लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी उजवी भुसारी काॅलनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार दगडे तपास करत आहेत. Maharashtra crime update

Leave a Comment