Desi Cow Conservation : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर देशी गो-संवर्धनाला नवी दिशा – विशेष लेख

IoT आणि AI तंत्रज्ञानामुळे पशुपालन अधिक शाश्वत, नफायुक्त आणि वैज्ञानिक बनण्याकडे नवी वाटचाल

पुणे – Desi Cow Conservation : भारतीय कृषी व्यवस्थेत देशी गाईंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या संवर्धनातून केवळ दुग्धोत्पादनच नव्हे तर शेतीची शाश्वतता, पर्यावरण संतुलन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या उत्पादन गरजांच्या युगात पारंपरिक पशुपालन पद्धतींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज बनली आहे. या अनुषंगाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्स सारखी अत्याधुनिक साधने पशुपालन क्षेत्रात नवी दिशा देत आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने गाईंचे आरोग्य व्यवस्थापन, आहार नियोजन, प्रजनन प्रक्रिया आणि दुग्धोत्पादन अधिक अचूक, कार्यक्षम व वैज्ञानिक पद्धतीने करता येत आहे.’

Maza Gaon Arogya Sampanna Gaon : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव”: ग्रामीण महाराष्ट्रासाठी आरोग्य क्रांतीची नवी सुरुवात – विशेष लेख

Desi Cow Conservation : या लेखमालिकेच्या माध्यमातून देशी गो-संवर्धनात होत असलेल्या आधुनिक बदलांचा, संशोधनाचा आणि नवकल्पनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध तंत्रज्ञान व प्रणालींची माहिती देऊन पशुपालन अधिक शाश्वत आणि नफायुक्त करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने शेतकऱ्यांसाठी विविध आयओटी-आधारित प्रणाली विकसित केल्या आहेत. प्रकल्पामध्ये तयार केलेला तापमान व आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला (फुले अमृतकाळ), पर्यावरणपूरक गोठा प्रणाली (फुले-प्रशांत), 24 तासामध्ये करावयाच्या दैनंदिन कामाचे मार्गदर्शन व नियोजन (फुले- डेअरी पायलट), पशुपालन व दुग्ध व्यवस्थापनातील संख्यात्मक माहिती आणि आकडेवारी (फुले डेअरी मार्गदर्शक), नोंदणी सहाय्यक प्रणाली (फुले ई-डेअरी फार्म) आणि दूध संकलन व गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली (फुले डेअरीमॅन) अनेक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत. सुमारे १३७ वर्षांचा समृद्ध इतिहास लाभलेल्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, पुणे हे केंद्र आजही हजारो तरुणांसाठी सर्जनशीलता, नवकल्पना आणि श्रमसंस्कारांचे प्रेरणास्थान ठरत आहे. Desi Cow Conservation

तापमान व आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला (“फुले अमृतकाळ”):

बदलत्या हवामानाचा पशुधनास चारा व पाणी पुरविण्यासोबतच आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. प्रशिक्षण केंद्राने एक नाविन्यपुर्ण उपाय विकसित केला आहे. तो म्हणजे फुले अमृतकाळ हे इंटरनेट ऑफ थिंग्स्वर काम करणारे तापमान आर्द्रता निर्देशांक आधारीत पशुधनाबद्दल सल्ला देणारे अॅप आहे.

या अॅपद्वारे शेतकऱ्यांना जनावरांचा उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी गोठ्यातील तापमान घटविण्याकरीता व योग्य आर्द्रता राखण्याकरीता सावलीची सोय करणे, Desi Cow Conservation  योग्य वायु विजन राखणे, पिण्याकरीता थंड पाणी उपलब्ध करून देणे, फॅन किंवा फॉगर यंत्रणा स्वंयचलित पध्दतीने सुरू करणे तसेच संतुलित आहार नियोजन इत्यादी उपाय योजना करण्यासाठी वेळोवेळी सुचना दिल्या जातील. फुले अमृतकाळ अॅप वापरून शेतकरी त्यांच्या पशुधनाचे आरोग्य व उत्पादनामध्ये सुधारणा घडवून उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या ताणातून होणारे नुकसान टाळत सध्याच्या हवामान बदलाच्या परिस्थितीत देखील त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन शाश्वत पध्दतीने राखू शकतील.

पर्यावरणपूरक गोठा प्रणाली (फुले-प्रशांत):

विविध नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांच्या आरोग्यास वारंवार धोका निर्माण होतो जसे की वाढते तापमान, अनियमित पाऊस, कडाक्याची थंडी व वादळी वारे यासारख्या नैसर्गिक आपत्ती पासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी तसेच त्यांना आरामदायी वातावरण मिळण्यासाठी प्रकल्पामद्धे पर्यावरण पूरक गोठा बांधण्यात आला आहे. ह्या गोठ्यातील स्वयंचलित तापमान व आर्द्रता नियंत्रणाद्वारे उष्णता ताण कमी करून जनावरांचा आराम व उत्पादकता वाढवते. Desi Cow Conservation

ह्या गोठ्याचे अनन्यसाधारण फायदे पाहायला मिळतात त्यामध्ये प्रामुख्याने तापमान आणि आर्द्रता नियंत्रण, प्रतिकूल हवामानापासून हंगामी संरक्षण, प्रखर सूर्य किरणांपासून संरक्षण, अल्हाददायक व अनुकूल वातावरण, आरोग्य व्यवस्थापन, जनावरांच्या कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. प्रकल्पातील हा पर्यावरण पूरक गोठा येणाऱ्या काळात पशुपालनातील नवी दिशा ठरणार आहे. भविष्यात विविध सामग्री वापरून कमी खर्चात पर्यावरण पूरक गोठे तयार करण्याचा प्रकल्पाचा मानस आहे व त्या अनुषंगाने काम चालू आहे. Desi Cow Conservation

फुले- डेअरी पायलट : पशुपालन व दुग्ध व्यवस्थापनातील २४ तासामध्ये करावयाच्या दैनंदिन कामाचे मार्गदर्शन व नियोजन मोबाइल किंवा वेबवरून करणे शक्य होते. फुले डेअरी मार्गदर्शक – पशुपालन व दुग्ध व्यवस्थापनातील इत्थंभूत सांखेकी माहिती जनावरांचे वजन, वय, प्रजनन व्यवस्थापन, जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन, लसीकरण, जंतनाशक वेळापत्रक, जाती निहाय माहिती, डेअरि कॅलेंडर, जनावरांच्या अवस्थेनुसार नियोजन, पशु संशोधन संदर्भातील वेबसाइट, शेणानुसार अवस्थे नुसार मूल्यांकन, शरीर मापणानुसार माहिती, आहार नियोजन – चारा पेरणी व कापणी नियोजन, दूध उत्पादन प्रकिया, विविध गुणवत्ता आधारित चाचण्या, खर्च व नफा-तोटा अहवाल आणि हवामान आधारित सल्ला संदर्भात मार्गदर्शक व सर्व कॅलक्युलेशन करून देणारे ॲप आहे.

Desi Cow Conservation  : फुले ई-डेअरी फार्म (नोंदनी सहाय्यक प्रणाली) : पशुपालन व दुग्ध व्यवस्थापनातील नोंदणी आधारित इत्थंभूत माहिती. रिअल-टाईम डेटा व विश्लेषणाद्वारे शेतकऱ्यांना महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाते. तसेच संपूर्ण रेकॉर्ड ठेवता येते. फुले डेअरीमॅन (दूध संकलन व गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली): दूधाची पारदर्शकता, गुणवत्ता आणि उत्पत्ती निश्चित करण्यासाठी ब्लुटुथ आधारित मॉनिटरिंग व फुले ई-डेअरि फार्मशी एकत्रित प्रणाली आहे.

पशुपालनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा एक मोठा बदल घडवून आणत आहे, ज्यामुळे पशुपालन अधिक कार्यक्षम आणि वैज्ञानिक बनत आहे. एआय आधारित सेन्सर आणि उपकरणांचा वापर करून गाईचे आरोग्य, आहार नियोजन, दुग्धोत्पादन, गोठ्यातील जनावरांची संपूर्ण माहिती, प्रजनन व्यवस्थापन माहिती अधिक अचूकतेने संकलन व पूर्तता करता येते. प्रजनन व्यवस्थापन आणि स्वयंचलित दूध काढण्याच्या प्रक्रियेत एआयचा वापर करून उत्पादकता वाढवता येते. जनावरांचे दैनंदिन कामकाज कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सुरळीतपणे करता येते त्या संदर्भात मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात येत आहे. सेन्सरच्या मदतीने गायींच्या हालचाली आणि मुरघास व्यवस्थापनावर काम चालू आहे. एकूणच प्रकल्पामध्ये, एआयच्या मदतीने गाईंच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याने उत्पादनक्षमता वाढविण्यासोबतच खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करुन शेतकऱ्यांसाठी सर्व तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा मानस आहे. Desi Cow Conservation

Desi Cow Conservation  या सर्व प्रणाली शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय अधिक शाश्वत, नफायुक्त व वैज्ञानिक पद्धतीने करण्यास मदत करतात. स्वयंचलित दुध काढणी यंत्रे गायींना त्रास न देता अचूक आणि स्वच्छ पद्धतीने दूध काढण्याचे काम करत आहे, ज्यामुळे वेळ आणि श्रमांची बचत होते. प्रकल्पात चारा कापणी व कुट्टी करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरण्यासाठी ट्रॅक्टर संचलित फोरेज हार्वेस्टरचा वापर केला जातो, Desi Cow Conservation  तसेच चारा कापणीसाठी ट्रॅक्टर माउंटेड फ्रंट रिपर, लसूणघास कापणी यंत्र, जनावरांचे पशुखाद्य पेंड तयार करण्याचे यंत्र, चाऱ्याची कुट्टी करून साईलेज बॅग भरण्याचे यंत्र, पिकांमध्ये फवारणी करण्यासाठी स्लरीगाडा, व दुध पॅकिंग करण्यासाठी स्वयंचलित दुध पॅकिंग मशीन आदी उपलब्ध आहेत. आजारपण, अपघात इत्यादींमुळे बसलेल्या गाईला उचलण्यासाठी हायड्रोलिक काऊ लीफ्टर, मॅनुअल काऊ लीफ्टर व ट्रॅवीस (खोडा), शेण उचलण्याचे मशीन देखील उपलब्ध आहेत. या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर उत्पादनक्षमता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ घडवून आण्यास मदत होत आहे.

1 thought on “Desi Cow Conservation : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर देशी गो-संवर्धनाला नवी दिशा – विशेष लेख”

Leave a Comment