online fraud India : पुण्यात सायबर फसवणुकींचा सुळसुळाट; ऑनलाइन आमिषांना नागरिक बळी

ऑनलाइन टास्क, क्रेडिट कार्ड अपडेट व डॉक्टर अपॉईंटमेंटच्या नावाखाली तिघांची लाखोंची फसवणूक; पोलिसांकडून गुन्हे दाखल

पुणे – online fraud India : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वेश्याव्यवसाय करणाऱ्या सहा महिलांविरुद्ध आंबेगाव पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. बाह्यवळण मार्गावर थांबून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांविरुद्ध या भागातील स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. बाह्यवळण मार्गावरील आंबेगाव परिसरात महिला थांबतात. संबंधित महिला वेश्याव्यवसाय करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या.

Aniruddha Deshpande : अनिरुद्ध देशपांडे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा; रक्तदान, आरोग्य तपासण्या आणि शिष्यवृत्ती उपक्रमांची मेजवानी

online fraud India : रहिवाशांना त्याचा त्रास होत होता. पोलिसांनी या प्रकरणी सहा महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम पाच अन्वये नोटीस बजावली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करत आहेत. नवले पूल परिसरात रस्त्यावर थांबून काही महिला वेस्यावय्वसाय करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलिसांनी तेथे कारवाई करुन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.

online fraud India ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

पुणे- घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी सिंहगड रस्ता भागातील तरुणाची २ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण सिंहगड रस्ता भागात राहायला आहे.

सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला एक काम ऑनलाइन पद्धतीने करण्यास दिले. या कामाचे पैसे तरुणाच्या खात्यात जमा केल्याचे चोरट्यांनी सांगितले. प्रत्यक्षात चोरट्यांनी तरुणाच्या खात्यात पैसे जमा केले नव्हते. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी तरुणाला पैस गुंतविण्यास सांगितले. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी २ लाख ७१ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. online fraud India

सायबर चोरट्यांकडून तरुणीची ३ लाखांची फसवणूक

पुणे- online fraud India : क्रेडीट कार्डची माहिती अद्ययावत (अपडेट) करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी खडकी परिसरातील एका तरुणीची दोन लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. क्रेडीट कार्डची माहिती अद्ययावत न केल्यास बंद करण्यात येईल, अशी भीती दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणीच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा दुरुपयोग करुन चोरट्यांनी तरुणीच्या खात्यातून पैसे काढून घेतले.

डाॅक्टरांची ‘ऑनलाइन अपाॅईंटमेट’ घेणाऱ्या महिलेची ५ लाखांची फसवणूक

पुणे- सायनसचा त्रास होत असल्याने प्रसिद्ध डाॅक्टरांची ऑनलाइन अपाॅईंटमेंट घेणाऱ्या ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी ५ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. online fraud India

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांना सायनसचा त्रास होत आहे. त्यांनी मोबाइलवर या विकारावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांची माहिती घेतली. डाॅक्टरांची माहिती घेतल्यानंतर त्यांना एक मोबाइल क्रमांक मिळाला. डाॅक्टरांची अपाॅईंटमेंट घेण्यासाठी त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा डाॅक्टरांऐवजी तेथे सायबर चोरट्यांनी त्यांचा मोबाइल क्रमांक टाकला होता. सायबर चोरट्यांनी अपाॅईंटमेंट मिळवण्यासाठी सुरुवातीला पाच रुपये

online fraud India ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यास सांगितले. महिलेने ऑनलाइन पद्धतीने पाच रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. महिलेचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला आहे. चोरट्यांनी महिलेचा मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून ५ लाख ५४ हजार रुपये स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केले. त्या वेळी कुटुंबियांना संशय आला. चोरट्याने मोबाइल क्रमांक बंद केल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर तपास करत आहेत.

1 thought on “online fraud India : पुण्यात सायबर फसवणुकींचा सुळसुळाट; ऑनलाइन आमिषांना नागरिक बळी”

Leave a Comment