रिक्षाचालकाकडून बॅग चोरी, भरधाव कंटेनरने पादचाऱ्याचा बळी, तर शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने लाखोंची ऑनलाईन फसवणूक; पोलिसांकडून तपास सुरू
पुणे – Theft Case Pune : प्रवाशाने क्षणभरासाठी रिक्षातून उतरल्याचा फायदा घेत अनोळखी रिक्षा.चालकानेच त्याची बॅग चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रिक्षाचालक फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २९ मार्चला सकाळी साडेदहाच्या सुमारास रिक्षातून प्रवास करत होते. सय्यदनगर अंडर पासजवळ ते लघुशंकेसाठी रिक्षातून खाली उतरले. त्यावेळी त्यांच्या सामानाची बॅग रिक्षामध्येच ठेवलेली होती. संधी साधत रिक्षा चालकाने बॅग घेऊन पळ काढला. बॅगेमध्ये लॅपटॉप, मोबाईल, कपडे असा ७७ हजार रुपयांचा ऐवज होता. घटनेनंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. Theft Case Pune
भरधाव कंटेनरची धडक; अज्ञात पादचाऱ्याचा मृत्यू
पुणे-भरधाव कंटेनरच्या धडकेत एका अज्ञात पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना खराडी बायपास चौकात नगर–पुणे रोडवर घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली असून, याप्रकरणी लक्ष्मण अंकुश सोलनकर (वय ३५, रा. लातूर) या कंटेनर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. संबंधित व्यक्ती हा नगर–पुणे रोडकडून पुण्याच्या दिशेने रस्ता ओलांडत असताना कंटेनरने त्याला जोरदार धडक दिली. अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, शहरात वाढत्या वेगवान आणि निष्काळजी वाहन चालकांमुळे अपघातांच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची ऑनलाईन फसवणूक
पुणे- Theft Case Pune शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत असून, डेक्कन आणि भारती विद्यापीठ परिसरात अशाच दोन वेगवेगळ्या प्रकरणांत मिळून ५१ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.
फेसबुकवरील शेअर ट्रेडिंगच्या जाहिरातीद्वारे एकाला सायबर चोरट्यांनी जाळ्यात ओढले. त्यांना ग्रुपमध्ये ऍड करून अँप डाउनलोड करण्यास सांगितले. डेक्कन परिसरातील अशोक रामचंद्र देवधर (वय ७१, रा. कर्वे रोड) यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. १९ जानेवारी ते २४ मार्च २०२६ दरम्यान तब्बल ३७ लाख ३० हजार ७६५ रुपयांची फसवणूक करण्यात आली.Theft Case Pune
Theft Case Pune भारती विद्यापीठ परिसरातील श्रीकांत बळीराम शेळके (वय ४३, रा. कात्रज) यांना युट्युब लिंकद्वारे शेअर ट्रेडिंग स्कीममध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आले. आरोपींनी त्यांचे रजिस्ट्रेशन करून विविध बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले. मार्च २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत १४ लाख १० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. दोन्ही प्रकरणांत आरोपींनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केली आहे. पोलिसांकडून प्रकरणांचा तपास करण्यात येत आहे.