Pune Crime News : सराईत दुचाकी चोरट्याला अटक, वाहन जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश

पुणे प्रतिनिधी 

पुणे – Pune Crime News : शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंगला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच एका सराईत वाहन चोरट्याला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश आले आहे. सुरज शिवाजी सुरवसे (वय २५, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून, तो सराईत दुचाकी चोर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Pune Crime News : पुण्यात फसवणूक आणि चोरीचे प्रकार उघड; साडेसात लाखांची फसवणूक

वाहन चोरीच्या पार्श्वभूमीवर विश्रामबाग पोलीस आणि युनिट एककडून चोरट्याचा समांतर तपास सुरू होता. संबंधित वाहन चोरटा बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगर परिसरात राहत असल्याची माहिती पोलीस अंमलदार मठपती यांना मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने धाव घेत आरोपी सुरज सुरवसे याला ताब्यात घेत अटक केले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, शैलेश संखे, पोलीस निरीक्षक अजित जाधव, उपनिरीक्षक राहुल मखरे, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, मठपती, निलेश साबळे, शशिकांत दरेकर, संदेश काकडे, ज्योती मुल्का, डोंगरे, प्रफुल्ल शेलार यांनी केली आहे. Pune Crime News

Leave a Comment