Accident Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यावर डंपरची धडक; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

कात्रज-कोंढवा रस्त्यावर डंपरची धडक; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे – Accident Pune भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. अपघातानंतर पसार झालेल्या डंपर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनिकेत राम बनचर (वय २२, रा. सेवक रस्ता, कुंभार वाडा, परभणी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत अनिकेतचा भाऊ अभिषेक (वय २४) याने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime : पुण्यात तूळशीबागेत दागिने चोरी, आंबेगावात खुनाचा प्रयत्न, उपाहारगृहात गॅसगळती, भोंदूला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अनिकेत हा कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन २६ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास निघाला होता. खडी मशीन चौक परिसरात भरधाव डंपरने दुचाकीस्वार अनिकेतला धडक दिली. अपघातात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपर चालक पसार झाला. अनिकेतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता. पोलीस उपनिरीक्षक पंकज खराडे तपास करत आहेत.  Accident Pune

Leave a Comment