Ramtekdi Police Chowki : गुंडानो सावध रहा; सुधारणा न झाल्यास निघणार पोलीस काढणार तुमची धिंड

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा इशारा 

पुणे – Ramtekdi Police Chowki : शहरातील ‘हडपसरमधील रामटेकडी परिसरात दाट वस्ती आहे. या भागात गुन्हेगारी आहे. गुन्हेगारांना पोलिसांकडून सुधारण्याची संधी देण्यात येते. सुधारणा न झाल्यास गुंडाविरुद्ध कडक कारवाई करून त्यांची धिंड काढण्यात येईल,’ असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. हडपसरमधील रामटेकडी परिसरात नवीन पोलीस चौकी बांधण्यास बांधकाम व्यावसायिक नाईकनवरे यांच्याकडून सहाय्य करण्यात आले आहे. पोलीस चौकीचे भूमिपूजन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

ESIS Scheme Maharashtra : कामगार विमा योजनेचा विस्तार वाढवावा; लाभार्थी संख्या दोन कोटींवर नेण्याचे आवाहन – मंत्री प्रकाश आबिटकर

कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गु्न्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी आधिकारी सतीशकुमार खडके, नगरसेविका हेमलता मगर, बांधकाम व्यावसायिक हेमंत नाईकनवरे, रणजीत नाईकनवरे, गौरी नाईकनवरे उपस्थित होते. Ramtekdi Police Chowki

‘गृह विभागाने गेल्या वर्षी पुण्यात १२ नवीन पोलीस ठाण्यांना दिली मंजुरी 

नवीन पोलीस ठाण्यांचे कामकाज सुरू झाले. पुणे पोलीस दलात लवकरच १८०० पोलीस शिपायांची भरती होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८०० पोलीस शिपाई सेवेत रूजू होणार आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याचे कामकाज चालविताना मनुष्यबळाची उणीव भासणार नाही. रामटेकडी वसाहतीत ३० हजार नागरिक राहायला आहेत. या भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, तसेच अवैध धंदे करणाऱ्यांची माहिती संकलित करण्यात येणार अहे. सराइतांना पोलिसांकडून सुधारण्याची संधी देण्यात येते. त्यांच्यात सुधारणा न झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, तसेच त्यांची धिंडही काढण्यात येईल,’ असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले. Ramtekdi Police Chowki

Ramtekdi Police Chowki : ‘पोलिसांकडून नगरसेवकांशी संवाद साधण्यात येत आहे. प्रभागातील गुन्हेगारी, अमली पदार्थ विक्री, अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी नगरसेवकांचे सहकार्य महत्त्वाचे असणार आहे,’ असे त्यांनी नमूद केले. चेतन तुपे, हेमंत नाईकनवरे यांनी मनोगत व्यक्त केले. रणजीत नाईकनवरे यांनी आभार मानले.

2 thoughts on “Ramtekdi Police Chowki : गुंडानो सावध रहा; सुधारणा न झाल्यास निघणार पोलीस काढणार तुमची धिंड”

Leave a Comment