Maharashtra crime news : पुण्यात चोरी व मारहाणीच्या घटना; नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना

 तुळशीबागेत महिलांचे मंगळसूत्र चोरीला; घोरपडीत वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण

पुणे – Maharashtra crime news : तुळशीबागेत खरेदीसाठी गेलेल्या महिलांकडील ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून ७२ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्याने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अनेक चोरीच्या घटना घडत आहेत त्यामध्ये विशेषता तुळशीबागेत महिलांना टार्गेट केले जात आहे महिलांच्या कानातील गळ्यातील व पर्समधील मौल्यवान वस्तू चोरांकडून लंपास केल्या जात आहेत त्यामुळे महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पुण्यातील महिलांना पोलिसांकडून वारंवार सावध केले जात असून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे पोलिसांकडून सुद्धा वारंवार गस्त घातली. Maharashtra crime news

तुळशीबागेत महिला अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी जात असतात यामध्ये प्रामुख्याने पुरुषांची संख्या कमी असते याच गोष्टीचा फायदा घेत चोरटे महिलांना टार्गेट करत असतात.

online fraud India : पुण्यात सायबर फसवणुकींचा सुळसुळाट; ऑनलाइन आमिषांना नागरिक बळी

Maharashtra crime news : तक्रारदार महिला तुळशीबागेत शनिवारी (४ एप्रिल) दुपारी चारच्या सुमारास खरेदीसाठी गेली होती. तुळशीबाग गणपती मंदिर परिसरात चोरट्याने पिशवीत ठेवलेले मंगळसूत्र चोरून नेले. रविवारी (५ एप्रिल) दुपारी तुळशीबागेत खरेदी करणाऱ्या महिलेच्या पिशवीतून २० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५५ वर्षीय महिला वारजे-एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात राहायला आहे. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास त्या तुळशीबागेत खरेदी करत होत्या. त्यावेळी गर्दीत महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी पिशवीतून मंगळसूत्र चोरून नेले. पोलीस कर्मचारी गोरे तपास करत आहेत.

वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण – टोळक्याविरुद्ध गु्न्हा दाखल

पुणे – Maharashtra crime news : वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण करण्यात आल्याची घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. यश रवी उन्नीतन (वय २०, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत यशने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maharashtra crime news : याप्रकरणी ईश्वर नरुटे, इशान मोरेरा यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश याचा आरोपींशी काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. शनिवारी (४ एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास यश बी. टी. कवडे रस्त्याने निघाला होता. त्या वेळी आरोपींनी त्याला अडवले. त्याला शिवीगाळ करून बॅटने मारहाण केली. मारहाणीत तो जखमी झाला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Leave a Comment