कोरेगाव पार्कमध्ये महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; शेअर बाजार गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिक व ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक
पुणे – Pune cyber fraud : बँक कर्मचारी महिलेला शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याची घटना कोरेगाव पार्क भागातील एका बँकेत घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.महंमद हसन अली शेख (रा. हरिगंगा सोसायटी, येरवडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत बँक कर्मचारी महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
online fraud India : पुण्यात सायबर फसवणुकींचा सुळसुळाट; ऑनलाइन आमिषांना नागरिक बळी
Pune cyber fraud पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोरेगाव पार्क भागताील एका बँकेत कर्माचारी आहे. आरोपी शेख हा बँकेत सोमवारी ( ६ एप्रिल) दुपारी पावणे एकच्या सुमारास व्यावसायिक कर्ज मिळवण्याबाबतची कागदपत्रे घेऊन बँकेत आला होता. बँकेचे लेखापरीक्षण सुरू असल्याने बँक कर्मचारी महिलेने शेख याला थांबण्यास सांगितले. या कारणावरुन शेखने महिलेला शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केला, तसेच महिलेला धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.
व्यावसायिकाची ९० लाखांची फसवणूक
पुणे-शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी जमीन खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या एका व्यावसायिकाची ९० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ४४ वर्षीय व्यावसायिक हडपसर भागातील मगरपट्टा सिटीत राहायला आहेत. Pune cyber fraud
सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा आठ ते दहा टक्के परतावा मिळेल ,असे आमिष दाखविले होते. त्यानंतर त्यांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.
सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची १२ कोटींची फसवणूक
पुणे- Pune cyber fraud सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. हडपसर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे हडपसरमधील भोसलेनगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी जानेवारी महिन्यात ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक योजनांची माहिती देऊन त्यांना जाळ्यात ओढले. शेअर बाजराात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी त्यांच्याकडून गेल्या तीन महिन्यात वेळोवेळी १२ कोटी ३१ लाख रुपये घेतले. ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी पैसे जमा केले. चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याचे भासविले. मात्र, प्रत्यक्षात चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. Pune cyber fraud
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चोरट्यंनी ज्या खात्यात पैसे जमा करुन घेतले. त्या बँक खात्याची तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून संबंधित बंँकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांचे फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारे संदेश आल्यास प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
1 thought on “Pune cyber fraud : पुण्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख; विनयभंग, ९० लाख व १२.३१ कोटींच्या सायबर फसवणुकीचे प्रकार उघड”