भूजल विभागातील दोन अधिकारी लाच घेताना रंगेहात; व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक ४३ कोटींच्या घोटाळ्यानंतर फरार
पुणे – Pune corruption case : भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल देण्यासाठी तब्बल २ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वरिष्ठ भूवैज्ञानिक व कनिष्ठ भूवैज्ञानिक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शिवाजीनगर परिसरातील वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयात करण्यात आली. दिवाकर नामदेव धोटे (वय ५३, वरिष्ठ भूवैज्ञानिक) आणि प्रियंका संदीपान घुले (वय ३९, कनिष्ठ भूवैज्ञानिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे.
El Nino ’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग अलर्ट; उष्णलहरींसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी
Pune corruption case तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी पीएमआरडीएकडे अर्ज केला होता. त्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल आवश्यक असल्याने त्यांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी आरोपी अधिकाऱ्यांनी सुरुवातीला २ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत अँटी करप्शन विभागाकडे तक्रार दिल्यानंतर २२ एप्रिलला पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी तडजोड करून २ लाख रुपयांवर व्यवहार निश्चित केला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.२४) सापळा रचून कारवाई करत प्रियंका घुले यांना २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले, तर धोटे यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 व 12 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुहास हडकर व पोलीस निरीक्षक खेडकर रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. Pune corruption case
पुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरार; ४३ कोटींचा घोटाळा; दोन हजार गुंतवणूकदारांची फसवणूक
पुणे- जादा परताव्याचे आमिषाने नागरिकांकडून कोट्यावधी रुपये जमा केल्याप्रकरणात व्हॅलेंटीना इडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल आणि ज्ञानेश्र्वर चोरगे हे दोघे फरार झाले आहेत. गुरूवारी या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलविले होते. मात्र, ते हजर झाले नाहीत. कंपनीचे कार्यालय देखील बंद असून, कंपनीचे ३० कोटी गोठविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. याप्रकरणी संतोष नाथा बांदल आणि ज्ञानेश्वर अनंत चोरगे यांच्यासह इतर साथीदारांवर ‘बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंधक अधिनियम’ आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. Pune corruption case
पुण्यातील कर्वे रस्ता परिसरातील ‘व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपनीने तब्बल ४३ कोटी १९ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरवातीला त्यांच्याकडे पोलिसांनी छापा मारून चौकशी केली. मात्र जेव्हा दुसऱ्यांदा त्या दोघांना चौकशीसाठी बोलविण्यात आले ते फरार झाले. आरोपींची कर्वे रोडवरील सक्सेस स्क्वेअर इमारतीत ‘व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड’चे कार्यालय थाटले होते. जुलै २०२२ पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडिया, व्हिडिओ आणि पत्रकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता. Pune corruption case
“आमच्या कंपनीत गुंतवणूक करा आणि दरमहा ५ टक्के परतावा मिळवा,” असे आमिष त्यांनी लोकांना दाखवले. आपली कंपनी अत्यंत नफ्यात असल्याचे भासवण्यासाठी खोट्या बॅलन्स शीट आणि ऑडिट रिपोर्टचा आधार घेतला. कंपनीची उलाढाल ३०० कोटी रुपये असून कंपनीच्या ११ उपकंपन्या कार्यरत असल्याचे सांगून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. प्रत्यक्षात या कंपनीला कोणताही नफा होत नसताना, केवळ नवीन गुंतवणूकदारांकडून आलेले पैसे जुन्या गुंतवणूकदारांना परतावा म्हणून देऊन हा प्रकार सुरू ठेवला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
तब्बल २ हजार लोकांची गुंतवणुक
कंपनीच्या योजनेत तब्बल २ हजार जणांनी गुंतवणूक केली आहे. आरोपींनी आरबीआय किंवा सेबीची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ठेवी स्वीकारल्या आहेत. गुंतवणूकदारांना पार्टनरशिपचे आमिष दाखवण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात त्यांचे पैसे वैयक्तिक फायद्यासाठी वापरण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. “नागरिकांनी अशा कोणत्याही जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये आणि गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची अधिकृतता तपासावी,” असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गोरक्ष घोडके करत आहेत. Pune corruption case