पुण्यात फसवणुकीचे थैमान; सायबर गुन्हे आणि घरफोडीच्या घटना वाढल्या
पुणे – cyber crime cases : कमी गुंतवणूकीवर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला तब्बल ५२ लाख ७२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३० जानेवारी ते २ एप्रिल २०२६ कालावधीत नर्हेत घडली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय महिलेने साबयर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
El Nino ’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग अलर्ट; उष्णलहरींसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नर्हेत राहायला असून, ३० जानेवारीला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉटसअॅपद्वारे जाहिरात पाठवली होती. त्यामध्ये कमीत कमी गुंतवणूकीवर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर सायबर चोरट्याने महिलेला लिंक पाठवून डाउनलोड करण्यास सांगितले. सुरूवातीला कमी गुंतवणूकीवर जादा नफा झाल्याचे दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांच्याकडून ५२ लाख ७२ हजार रूपये वर्ग करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत. cyber crime cases
नोकरानेच मारला डल्ला, ७ लाखांचा ऐवज चोरला
पुणे- घरकाम करणार्या नोकराने मालकाची नजर चुकवून साडेचार लाखांचे दागिने आणि रोकड असा मिळून ७ लाख ५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ८ मार्च ते ९ एप्रिल २०२६ कालावधीत वानवडीतील फातिमानगरातील मनीष दर्शन सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. cyber crime cases
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला फातिमानगरातील मनीष दर्शन सोसायटीत राहायला असून, मागील काही महिन्यांपासून त्यांच्या घरात काम करण्यासाठी नोकर कार्यरत होता. ८ मार्च ते ९ एप्रिल कालावधीत त्याने महिलेची नजर चुकवून घरातील साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा ७ लाख ५ हजारांचा ऐवज चोरून नेला. तो कामावर येत नसल्यामुळे महिलेला संशय आल्यानंतर त्यांनी ऐवजाची तपासणी केली. त्यावेळी दागिन्यांसह रोकड चोरीला गेल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.
गुंतवणूकीच्या आमिषाने तरूणाची २२ लाखांची फसवणूक
जडेजा ब्रदर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी तरूणाचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांना पैसे पाठवण्यास भाग पाडून तब्बल २१ लाख ७१ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना १५ जून २०२५ ते ३ फेब्रुवारी २०२६ कालावधीत डेक्कन परिसरात घडली. याप्रकरणी तरूणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर तपास करीत आहेत. cyber crime cases
वाढदिवसाला गिफ्ट देण्याच्या बतावणीने महिलेला गंडा
पुणे- मेट्रोमोनिअल साईटद्वारे झालेल्या ओळखीतून सायबर चोरट्याने महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांना वाढदिवसाला परदेशातून गिफ्ट पाठवित असून, त्याची कस्टम ड्युटी भरण्याच्या नावाखाली तब्बल १७ लाख ५७ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना १० फेबु्रवारी ते २६ मार्च कालावधीत वडगावमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. cyber crime cases
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडगावमध्ये राहायला असून, १० फेबु्रवारीला सायबर चोरट्याने महिलेला फोन केला. मेट्रोमोनिअल प्लॅटफॉर्मवरून बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संंपादित केला. त्यानंतर त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून स्वतःचे घर, कार असल्याचे सांगून लवकरच हॉस्पीटल सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने महिलेला वाढदिवसानिमित्त गिफ्ट देणार असल्याची बतावणी केली. त्यासाठी कस्टम डयुटी भरावी लागेल, हे कारण देउन त्याने महिलेकडून १७ लाख ५७ हजार रूपये वर्ग करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटणकर तपास करीत आहेत.
जुन्या वादातून मारहाण करणारा अटकेत
पुणे- जुन्या भांडणाच्या वादातून दोघांना बेदम मारहाण करीत ७ हजारांची लुट करणार्याला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २१ एप्रिलला रात्री साडेदहाच्या सुमारास बालेवाडी परिसरात घडली आहे. तेजस सोमनाथ अंभोरे उर्फ प्रीतम (वय २४ रा. बिबवेवाडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १९ वर्षीय तरूणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. cyber crime cases
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण आणि त्याचा मित्र आदिनाथ कनेवाड हे २१ एप्रिलला बालेवाडी परिसरात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी जुन्या वादातून झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपी तेजस त्याठिकाणी पोहचला. त्याने दोघांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत तक्रारदार तरूणाच्या खिशातील ७ हजारांची रोकड चोरून नेली. दोघांचे मोबाइलही आरोपीने चोरून नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव तपास करीत आहेत. cyber crime cases