crime incidents Pune : पुण्यात गुन्हेगारीचा वाढता विळखा; लूट, तोडफोड आणि खुनानंतर दहशतीच्या सलग घटना

सहकारनगरमध्ये तरुणाची लूट, तळजाईत सराईत अटकेत तर शिवाजीनगर परिसरात खुनानंतर कोयते उगारून धमकी

पुणे – crime incidents Pune पादचारी तरुणाला धमकावून त्याच्याकडील १२ हजारांची रोकड लुटल्याची घटना सहकारनगरमधील तुळशीबागवाले काॅलनीत घडली. या प्रकरणी चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सनैवर मोजा अन्सारी (वय ३३, सध्या रा. तुळशीबागवाले काॅलनी, सहकारनगर, मूळ रा. उत्तर प्रदेश ) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Crime Report Pune : पुण्यात गुन्हेगारीचा कहर; घरफोडी, अपघात, लूट आणि सायबर फसवणुकीच्या घटना उघड

crime incidents Pune पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. तो मजुरी करतो. अन्सारी हा तुळशीबागवाले काॅलनी परिसरातून महिनाभरापूर्वी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निघाला होता. त्याला मासिक वेतन मिळाले होते. १२ हजारांची रोकड त्याने खिशात ठेवली होती. चौघांनी त्याला अडविले आणि तुझ्या मोबाइल संच फुटला आहे, असे सांगून धमकाविण्यास सुरुवात केली. अन्सारीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्याच्या खिशातील १२ हजारांची रोकड लुटून चोरटे पसार झाले. सुरुवातीला घाबरलेल्या अन्सारीने पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

तळजाई वसाहतीत दुचाकींची तोडफोड करणारा अटकेत

पुणे- शहरातील पद्मावती भागातील तळजाई वसाहतीत दहशत माजवून तोडफोड करणाऱ्या सराइताला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. crime incidents Pune

साहिल उर्फ भावड्या संतोष कुचेकर (वय २५, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत संजय वसंत खंदारे (वय ४२, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१७ एप्रिल) मध्यरात्री दीडच्या सुमारास कुचेकर हा तळजाई वसाहत परिसरात आला. ‘मी तळजाई वसाहतीतील भाई आहे. माझ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केल्यास त्याला जिवे मारू’, अशी धमकी त्याने रहिवाशांना दिली. त्यानंतर त्याने वसाहतीतील दुचाकींची दांडक्याने तोडफोड करून दहशत माजविली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश मोरे, उपनिरीक्षक सद्दामहुसेन फकीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे तपास करत आहेत. यापूर्वी तळजाई वसाहत दहशत माजविण्यासाठी सराईतांनी वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी सराइतांनी तळजाई वसाहतीतील २५ हून जास्त वाहनांची तोडफोड केली होती. crime incidents Pune

खून केल्यानंतर कोयते उगारून आरोपींची दहशत; शिवाजीनगर भागातील घटना

पुणे- शहरातील विश्रांतवाडी भागात वैमनस्यातून एका तरुणाचा खून केल्यानंतर आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविल्याची घटना घडली. शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीत ही घटना घडली. आरोपींनी नागरिकांना धमकावून घराच्या दरवाज्याची तोडफोड केली. विश्रांतवाडी भागात १५ एप्रिल रोजी मध्यरात्री शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीतील गौरव तेलंगी याच्यावर काेयत्याने वार करुन खून करण्यात आल्याची घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी तौफिक शेख, राजन दोरास्वामी (दोघे रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील वसाहत) यांच्यासह साथीदारांना अटक केली होती. crime incidents Pune

crime incidents Pune तेलंगीचा खून केल्यानंतर मध्यरात्री पसार झालेले आरोपी तौफिक, राजन आणि साथीदार शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीत शिरले. त्यांच्याकडे कोयते होते. कोयते उगारून आरोपींनी दहशत माजविली. ’ प्रतिस्पर्धी टाेळीतील सराइतांना साथ देऊ नका. तौफिक-राजन टोळीच्या विरोधात गेल्यास जिवे मारू’, अशी धमकी आरोपींनी दिली. त्यानंतर आरोपींनी वसाहतीतील घरांच्या दरवाज्यावर कोयते आपटून दहशत माजविली. नागरिकांना शिवीगाळ करुन पसार झाले. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तौफिक शेख, राजन दौरास्वामी यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

Leave a Comment