गंजपेठेत सव्वा लाखांची चोरी, हडपसरमध्ये अपघातात दुचाकीस्वार ठार; कोंढव्यात लूट तर जेष्ठांना लाखोंचा ऑनलाईन गंडा
पुणे – Crime Report Pune : शहरातील मध्यवर्ती गंजपेठेत भरदिवसा चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत ५५ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १६ एप्रिलला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गंजपेठेतील श्रीनिवास इमारतीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
crime pune : पुण्यात गुन्हेगारी घटनांचा वाढता आलेख; मारहाण, हल्ले आणि निष्काळजीपणाचे प्रकार उघड
Crime Report Pune पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गंजपेठेतील श्रीनिवास सोसायटीत राहायला असून, १६ एप्रिलला ते कुटूंबियासह बाहेर गेले होते. त्यावेळी भरदुपारी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील ५५ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सव्वा लाखांवर ऐवज चोरून नेला. संध्याकाही सहाच्या सुमारास तक्रारदार हे घरी आले असता, त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करीत आहेत.
ट्रॅकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पुण्यात हडपसरमधील घटना Crime Report Pune
पुणे- शहरातील विविध भागात अवजड वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन करीत बेशिस्तपणे वाहने दामटली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवाला मुकावे लागत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेषतः उपनगरात पाणी टँकरसह, डंपर आणि हायवा चालकांकडून नियमांचे उल्लंघन नियमांना तिलांजली दिली जात आहे. त्यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाण वाढीस लागले असून, दुचाकीस्वारांसह पादचार्यांना जीव मुठीत धरून वागावे लागत आहे.
बेदरकारपणे टँकर चालवून दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे संबंधिताचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १६ एप्रिलला दुपारी पावणे दोनच्या सुमारास हडपसर परिसरातील रवीदर्शन बसस्थानकाजवळ घडला आहे. याप्रकरणी टॅकर चालकासह मालकाविरूद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. टँकर चालकाने जखमी दुचाकीस्वाराला रूग्णायलयात दाखल न करता पळ काढल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतीक अश्विन शेठ (वय ४३ रा. गुंजन सोसायटी, रास्ता पेठ )असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. नितीन बंबोली (वय ४४ रा. सॅलेसबरी पार्क) यांनी फिर्याद दाखल केली आहे. Crime Report Pune
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार प्र्रतीक शेठ हे रास्ता पेठेत राहायला होते. १६ एप्रिलला दुपारी पावणेदोनच्या सुमारास ते हडपसर परिसरात गेले होते. त्यावेळी भरधाव अज्ञात टँकर चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे खाली पडून प्रतीक गंभीररित्या जखमी झाले. अपघातात जखमीला पाहून टँकरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्याने जखमीला रूग्णालयात दाखल केले नाही. दरम्यान, टँकरमध्ये क्लिनरही नसल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बिराजगार तपास करीत आहेत. Crime Report Pune
कोंढव्यात दुचाकीस्वार तरूणाला लुटले
पुणे- दुचाकीवर प्रवास करीत घरी निघालेल्या दोघा तरूणांना अडवून चोरट्यांनी त्यांच्याकडील रोकड, मोबाइल असा १७ हजार २०० रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १५ एप्रिलला रात्री साडेनउच्या सुमारास कोंढवा खुर्दमधील नरवीर तानाजी मालुसरे चौकात घडली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राहणार्या ३६ वर्षीय तरूणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार तिघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime Report Pune : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण पिंपरी-चिंचवड परिसरात राहायला असून, १५ एप्रिलला रात्री साडेनउच्या सुमारास दोघेजण कोंढव्यातील नरवीर तानाजी मालुसरे चौकातून दुचाकीवर घरी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या तिघाजणांनी दुचाकीला गाडी आडवी उभी करून त्यांना थांबवले. चोरट्यांनी दोघा तरूणांना धमकावून त्यांच्याकडील १ हजार २०० रूपयांची रोकड आणि १६ हजारांचा मोबाइल असा ऐवज चोरून टोळके पसार झाले. याप्रकरणी दोघा तरूणांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रसाद जाधव तपास करीत आहेत.
जेष्ठाला ट्रेडींगमध्ये गुुंतवणूकीचे आमिष पडले ३३ लाखांना; सायबर चोरट्यांकडून गंडा
पुणे- ट्रेडींगमध्ये गुुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी ६९ वर्षीय नागरिकाला तब्बल ३३ लाख ४५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २४ फेबु्रवारी ते १८ मार्च २०२६ कालावधीत सदाशिव पेठेत घडली आहे. याप्रकरणी संबंधित जेष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. Crime Report Pune
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सदाशिव पेठेत राहायला असून, २४ फेबु्रवारीला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क साधला. शेअर मार्केटची माहिती देउन अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळले, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी केली. त्यानुसार जेष्ठाने अवघ्या एक महिन्यांत ३३ लाख ४५ हजार रूपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यांना परतावा न मिळाल्यामुळे जेष्ठाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरूण घोडके तपास करीत आहेत. Crime Report Pune
गुंतवणूकीच्या बहाण्याने जेष्ठाची ४६ लाखांची फसवणूक
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नफा कमवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी आणखी एका जेष्ठ नागरिकाला तब्बल ४६ लाख ४३ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १९ जानेवारी ते १७ मार्च कालावधीत बालेवाडीत घडली आहे. याप्रकरणी ६० वर्षीय नागरिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत. Crime Report Pune