हडपसरमधील अतिक्रमण कारवाईत गोंधळ, बसमधील महिला वाहकावर हल्ला आणि बालकाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल
पुणे – crime pune : अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या महापालिकेतील सहायक निरीक्षकला भाजी विक्रेत्यांनी शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना हडपसरमधील हांडेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षक अमोल लावंड यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शीतल महेश डांगे, रेखा सुदेश रोकडे, शाहिन मियाँसाहेब शेख, उषा दादाराव गायकवाड, सोनू सुदेश रोकडे (सर्व रा. हांडेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. crime pune
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून गुुरुवारी (१६ एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास हांडेवाडीतील भाजी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी हांडेवाडी परिसरातील भाजी विक्रेत्या महिलांनी कारवाईस विरोध करुन लावंड यांना धमकावले. ‘तू महिलांना शिवीगाळ केली. तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करतो’, अशी धमकी दिली. त्यानंतर अतिक्रमण कारवाईस विरोध करुन लावंड यांच्या गाडीची काच एकाने फोडली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भाजी विक्रेत्या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख तपास करत आहेत. crime pune
किरकोळ वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न
पुणे- crime pune किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याचा खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना वारजे-एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
क्रिश सुरेंद्रसिंग (वय २०, रा. अचानक चौक, उत्तमनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत विशाल चंद्रकांत घोरपडे (वय ३६, रा. लक्ष्मी निवास, देशमुखवाडी, शिवणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे यांचा सरबत विक्रीचा व्यवसाय आहे. गुरुवारी (१६ एप्रिल) सायंकाळी पाचच्या सुमारास आरोपींनी वैमनस्यातून क्रिश याला शिवीगाळ करुन त्याला मारहाण केली. क्रिश याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत. crime pune
पुण्यात पीमपी वाहक महिलेवर चाकूने वार
पुणे- धावत्या बसमध्ये पीएमपी वाहक महिलेवर प्रवासी तरुणाने चाकूने वार केल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी प्रवासी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुरेखा बळीराम भालेराव (वय ३८, सध्या रा. मुळशी, मूळ रा. मुखेड, नांदेड) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत भालेराव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एुप्रिल राेजी महापालिका भवन ते विमाननगर मार्गावरील पीएमपी बस रात्री आठच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृह चौकातून निघाली होती. त्यावेळी भालेराव प्रवाशांचे तिकीट काढण्याचे काम करत होत्या. त्यावेळी प्रवासी तरुणाला त्यांनी तिकिट काढण्यास सांगितले. या कारणावरुन प्रवासी तरुणाने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भालेराव यांनी त्याला बसमधून खाली उतरण्यास सांगितले. या कारणावरुन प्रवासी तरुणाने त्यांच्या मांडीवर चाकूने वार केला. त्यानंतर प्रवासी तरुण बसमधून उडी मारुन पसार झाला. पसार झालेल्या तरुणाचा शोध घेण्यात येत असून, पाेलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत crime pune .
बालकाच्या मृत्यूप्रकरणी डाॅक्टरांसह परिचारिकेविरुद्ध गुन्हा – वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणाचा ठपका
पुणे-बालकावर चुकीचे उपचार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरुन नवी पेठेतील एका रुग्णालयातील डाॅक्टरांसह परिचारिकेविरुद्ध गुन्हा सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी डाॅ. मुकुंद संगमनेरकर, डाॅ. गणेश आरेकर, डाॅ. श्रीधर जाधव, डाॅ. राधा संगमनेरकर, तसेच परिचारिका मनीषा शिंदे, सारिका सुतार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत गणपतराव गिते (वय ३४, रा. हेरंब सोसायटी, बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम २०२३ अन्वये गु्न्हा दाखल करण्या आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत गिते यांची मुलगी आदिती (वय ११ महिने) हिला उलटीचा त्रास होत असल्याने तिला मे २०२५ रोजी नवी पेठेतील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. उपचारात हलगर्जी केल्यास मुलीचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव डाॅक्टरांना होती. डाॅक्टर, तसेच परिचारिकेने चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप गिते यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला होता.
crime pune : त्यानंतर हे प्रकरण चौकशीसाठी ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपविण्यात आले होते. याप्रकरणाची वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने चौकशी केली. चौकशीत ११ महिन्यांच्या बालिकेवर चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आले. वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बालिकेचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने नोंदविला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.