खराडीत तडीपार गुंडाने माजवली दहशत, बिबवेवाडीत दुकान फोडले, तर पीएमपी बसमध्ये महिलांचे लाखोंचे दागिने चोरी
पुणे – Pune Crime Today : तडीपार गुंड, तसेच त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने दहशत माजविल्याची घटना खराडी परिसरात घडली. गुंडाने समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित केली. या प्रकरणी खराडी पोलिसांनी तडीपार गुंडासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी निखिल मधुकर कांबळे (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा ) याच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार दत्तात्रय खरपुडे यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune ACB trap : पुण्यात लाच घेताना वनक्षेत्र ‘सर्व्हेअर’ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले
Pune Crime Today : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे सराईत असून, त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कांबळे याला परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांनी दोन वर्षांसाठी पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तडीपार केल्यानंतर कांबळे हा साथीदारांसोबत खराडीतील रक्षकनगर भागात २८ मार्च रोजी सायंकाळी आला.
या भागातील गोल्ड सोसायटीसमोर कांबळे आणि त्याच्याबरोबर असलेले आठ ते दहा साथीदार थांबले होते. आरोपींनी या भागात दहशत माजविली. कांबळेने दहशत माजविण्याची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर कांबळेसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल असून, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करत आहेत.
मिठाई विक्री दुकानातून ७० हजारांची रोकड चोरीला
पुणे – Pune Crime Today : मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ७० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानाराम उमाजी चौधरी (वय ६४, रा. गंगाधाम, मार्केट यार्ड) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे बिबवेवाडीतील भारतज्योती सोसायटी परिसरात मयूर स्वीट हे मिठाई विक्रीचे दुकान आहे. ३० मार्च रोजी चौधरी यांनी रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद केले. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडले. दरवाज्याचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. गल्ल्यात ठेवलेली ७० हजार रुपयांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. चोरट्यांनी दुकानातील मोबाइल संच, तसेच केशर डब्बा चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मिठाई, ओैषध विक्री, तसेच किराणा माल दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड लांबविल्याची घटना वाढल्या आहेत. Pune Crime Today
पुण्यात पीएमपीएल प्रवासी महिलेचे ७ लाखांचे दागिने लंपास
पुणे- पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ६ लाख ९० हजार रुपयांचे साेन्याचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५४ वर्षीय महिला मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील रहिवासी आहेत.
Pune Crime Today : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसर गाडीतळ ते चिंचवड या मार्गावरील पीएमपी बसमधून ३० मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास प्रवास करत होत्या. पुणे -सोलापूर रस्त्यावर हडपसमधील वैदुवाडी परिसरात पीएमपी बसमध्ये तक्रारदार महिलेच्या शेजारी थांबलेल्या एका चोरट्या महिलेने उलटी आल्याची बतावणी केली. तक्रारदार महिलेला चोरट्या महिलेने धक्का दिला. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीत ठेवलेले ६ लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्या महिलेने लांबविले, असे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक इनामदार तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेचे दागिने लांबविण्याची आणखी एक घटना भवानी पेठ परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारादार ज्येष्ठ महिला पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. महिलेच्या शेजारील आसनावर बसलेल्या महिलेने त्यांना बोलण्यात गुंतवले. हातचलाखी करुन त्यांच्या गळ्यातील २८ हजारांची सोनसाखळी चोरून नेली. सहायक पोलीस फौजदार वाघेरे तपास करत आहेत. Pune Crime Today