Pune News पुण्यातील बाणेर भागातील घटना, ठेकेदारासह बिल्डरवर गुन्हा
पुणे – Pune News शहरातील बाणेरमधील बहुमजली इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून सेफ्टी लोखंडी जाळीचा पाईप खाली पडून कामगाराचा मृत्यू झाला. पाईप थेट खाली काम करणाऱ्या कामगाराच्या डोक्यात पडला. त्यात गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. करीम चमत्कार शेख (वय ३५, रा. लेबर कॅम्प, बावधन) असे मृत्यू झालेल्या कामगाराचा नाव आहे. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात ठेकेदार, बिल्डर यांच्यासह तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत करीम यांचा मेव्हणा रबिऊल राहीद शख यांनी तक्रार दिली आहे. ही घटना २८ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली.
Pune Crime News : पुण्यात वाहकाने प्रवासी युवतीशी केले अश्लील कृत्य; वाहकाला केली पोलिसांनी अटक
Pune News पोलिसांच्या माहितीनुसार, वायआरके व्हेंचर्स या कंपनीमार्फत बाणेरमधील पल्लोड फार्मस याठिकाणी यु.व्ही.होम्स कन्स्ट्रक्शनचे कामकाज सुरू आहे. बहुमजली इमारत बांधण्यात येत आहे. यादरम्यान, १५ व्या मजल्यावर सेफ्टी लोखंडी जाळी बसविली होती. त्याला पाईप देखील बसवलेले असतात. दरम्यान, करीम हा इमारतीच्या खाली काम करत होता. तेव्हा अचानक या जाळीचा एक पाईप खाली पडला. तो करीम याच्या अंगावर पडला. यात गंभीर जखमी झाल्याने करीम यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना न करता कामगारांची व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात येईल, असे हयगयीने व निष्काळजीपणे कृत्य केल्याने पोलिसांनी याप्रकरणी ठेकेदार, बिल्डर यांच्यासह तिघांवर गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. Pune News