दगडूशेठ परिसरात वाहतूक पोलिसाला मारहाण, खडकीत साडेचार लाखांची घरफोडी; पीएमपीएल बसमध्ये उलटीचा बहाणा करून ७ लाखांचे दागिने चोरणारी महिला अटकेत
पुणे – Pune police news : ट्रिपलशीट निघालेल्या दुचाकीस्वारांना अडविल्यानंतर त्यांनी वाहतूक पोलिसांना आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहोत असे म्हणत वाद घातला. त्यानंतर त्यांना मारहाण करून गणवेशाची बटने तोडल्याची घटना घडली. दगडूशेठ मंदिरासमोर ही घटना भरदुपारी घडली. याप्रकरणी नितीन रामदास कराळे (वय २८) व संदिप दिनकर सोनवणे (वय ३४) यांच्यासह इतर एकावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार सोहेल शेख यांनी तक्रार दिली आहे. Pune police news
Pune police news पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे फरासखाना वाहतूक विभागात नेमणूकीस आहेत. ते मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास दगडूशेठ मंदिरासमोर वाहतूक नियमन करत होते. तेव्हा अचानक त्यांना एका दुचाकीवर ट्रिपलशीट जात असल्याचे दिसले. त्यांनी गाडी अडविली. तेव्हा या आरोपींचा राग अनावर झाला. त्यांनी थेट आमची गाडी का अडवली, असे म्हणत त्यांची कॉलर पकडली. तु आम्हाला ओळखत नाही, आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहोत. तुला गाडी अडविण्याचा काय अधिकार आहे. असे म्हणत शिवीगाळ केली. त्यांच्याशी झटापट केली. यामध्ये तक्रारदार यांच्या गणवेशाचे बटन तुटले गेले. त्यांना हाताने मारहाण देखील केली. त्यांना ढकलून दिले असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मोकाशी हे करत आहेत. Pune police news
खडकीत घर फोडले; साडे चार लाखांचा ऐवज चोरला
पुणे- शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी खडकी परिसरात बंद फ्लॅट फोडून साडे चार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. भरदुपारी अवघ्या दोन तासात चोरट्यांनी ही चोरी केली आहे. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात ३५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे औंध रोडवरील श्री चेतन सोसायटी या इमारतीत राहण्यास आहेत. दरम्यान, सोमवारी दुपारी साडे चारच्या सुमारास ते काही कामानिमित्त घराला कुलूप लावून कुटूंबियासोबत बाहेर गेले होते. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, बेडरूममधील कपाटातून ४ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला. तक्रारदार सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. अधिक तपास पोलिस करत आहेत.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून गल्यातील १६ हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.
बसप्रवासात उलटीचा केला बहाणा, चोरट्या महिलेला अटक; वानवडी पोलिसांची कामगिरी
पुणे- Pune police news:पीएमपीएल बसप्रवासात उलटीचा बहाणा करीत महिला प्रवाशाला धक्का देउन त्यांच्या पर्समधून तब्बल ७ लाखांचे सोन्याचे दागिने चोरणार्या महिलेला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३० मार्चला रात्री दीडच्या सुमारास वैदूवाडी परिसरात प्रवासादरम्यान घडली होती. ननीता दिनेश कांबळे (वय ३७, रा. विश्रांतवाडी, मूळ-गुलबर्गा, कर्नाटक ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
तक्रारदार महिला आणि तिचा पती ३० मार्चला रात्री दीडच्या सुमारास हडपसर ते चिंचवडगाव असा पीएमपीएल प्रवास करीत होती. त्यावेळी वैदुवाडी बसस्टॉपजवळ बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेने उलटी येत असल्याचा बहाणा केला. महिलेला बाजूला सरकण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या पर्सची चैन उघडून सोन्याच्या दागिन्यांची छोटी पर्स चोरून नेली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पेट्रोलिंगवेळी पोलीस अमलदार विष्णू सुतार आणि अमोल गायकवाड यांना शिंदेवस्तीजवळ एक महिला थांबल्याची माहिती मिळाली. संबंधित महिला सोन्याचे दुकान कोठे असल्याचे विचारत होती. Pune police news
वानवडी तपास पथकाने धाव घेत ननीता कांबळे हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून ६ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली असून, उलटीच्या बहाण्याने महिलेच्या पर्समधून दागिन्यांची चोरी केल्याचे सांगितले. ही कामगिरी उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी नम्रता देसाई, वरीष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक संगिता जाधव, एपीआय उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे, अर्शद सय्यद, अभिजित चव्हाण व आशिष कांबळे यांनी केली. Pune police news
1 thought on “Pune police news : पुण्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच; मारहाण, घरफोडी आणि बसप्रवासात दागिने चोरीच्या घटना उघड”