Today Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीचा कहर; सायबर फसवणूक, वाहन चोरी आणि मद्यधुंद चालकाचा थरार

कोट्यवधींची ऑनलाईन फसवणूक, बनावट नंबरसह वाहनचोर अटकेत; मद्यधुंद चालकाने वाहनांना धडक देत पोलिसाचे अपहरण करण्याचा प्रयत्न

पुणे – Today Pune Crime : सायबर चोरट्यांनी पुणेकरांना वेठीस धरले असून, विविध आमिष दाखवून ऑनलाईन लूट केली जात आहे. अशा अनेक घटनेत तब्बल लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. प्रामुख्याने शेअर मार्कटचे मार्गदर्शन घेणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी संबंधिताचा विश्वास संपादित करून त्याला तब्बल १६ लाख ५२ हजार रूपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केली आहे. ही घटना ५ फेबु्रवारी ते २९ मार्च २०२६ कालावधीत केशवनगर, मुंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. Today Pune Crime

Pune police news : पुण्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच; मारहाण, घरफोडी आणि बसप्रवासात दागिने चोरीच्या घटना उघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुंढव्यातील केशवनगरात राहायला असून, ५ फेबु्रवारीला सायबर चोरट्याने संपर्क साधला होता. त्यांना शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूकीबाबत मार्गदर्शन केले होते. विश्वास संपादित झाल्यानंतर सायबर चोरट्याने संबंधित तक्रारदाराला गुंतवणूकीस भाग पाडले. सव्वा महिन्यांत तब्बल १६ लाख ५२ हजार रूपयांची गुंतवणूक करूनही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करीत आहेत.

बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी, जेष्ठाला १५ लाखांचा गंडा

Today Pune Crime बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला तब्बल १५ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना २४ ते २६ मार्च २०२६ कालावधीत वडगाव शेरीत घडली आहे. याप्रकरणी ८२ वर्षीय जेष्ठाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक हे वडगाव शेरीत राहायला असून, २४ मार्चला सायबर चोरट्याने संपर्क साधला होता. बँकेतील कर्मचारी असल्याची बतावणी करीत विश्वास संपादित केला. विश्वास संपादित झाल्यानंतर सायबर चोरट्याने संबंधित जेष्ठ नागरिक तक्रारदाराकडून १५ लाख रूपये वर्ग करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख तपास करीत आहेत.

शेअर ट्रेडींग गुंतवणूक पडली ३५ लाखांना

Today Pune Crime : शेअर ट्रेडींग कंपनीचे एजंट असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी एका तरूणाला तब्बल ३५ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना ७ ऑगस्ट ते २१ ऑक्टोबर २०२५ कालावधीत वाघोलीत घडली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय नागरिकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाघोलीत राहायला असून, ७ ऑगस्टला सायबर चोरट्यांनी त्यांना एका व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट केले. त्याठिकाणी संबंधिताने शेअर ट्रेडींग कंपनीचा एजंट असल्याचे भासवून, तरूणाला गुंतवणूकीला भाग पाडले. विश्वास संपादित झाल्यानंतर तक्रारदाराने ३५ लाख रूपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर तपास करीत आहेत. Today Pune Crime

वाहन चोरट्याची शक्कल, चोरीच्या वाहनाला बनावट क्रमांक; आरोपीला बाणेर पोलिसांनी केली अटक

पुणे- वाहन चोरट्याने शक्कल लढवून चोरीच्या वाहनाला बनावट क्रमांक टाकून ती स्वतःची असल्याचे भासवले. मात्र, नाकाबंदीवेळी बाणेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना ६ एप्रिलला संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बाणेर परिसरात नाकाबंदीवेळी उघडकीस आली आहे. तुकाराम संदीपान खांडेकर (वय ३८ रा. आंबेगाव खुर्द, कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार स्वप्नील मराठे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अमलदार संदीप मराठे हे बाणेर पोलीस ठाण्यात नियुक्तीला आहेत. ६ एप्रिलला ते पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदीत काम करीत होते. त्यावेळी त्यांनी एका वाहन चालकाला (एमएम १० डीवाय ३४५७) थांबवून कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी संबंधिताने कागदपत्रे नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्यामुळे आरोपी तुकाराम खांडेकर याला पोलिसांनी ठाण्यात आणून चौकशी केली. त्यावेळी त्याने ताब्यातील ५ लाखांचे वाहन चोरी करून दुसर्‍या वाहनाचा बनावट क्रमांक टाकल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे तपास करीत आहेत.

Pune cyber fraud : पुण्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख; विनयभंग, ९० लाख व १२.३१ कोटींच्या सायबर फसवणुकीचे प्रकार उघड

पुण्यात मद्यधुंद मोटार चालकाची वाहनांना धडक; कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांचा अपहरणाचा प्रयत्न

पुणे- Today Pune Crime : शहरातील वारजे भागात मद्यधुंद मोटार चालकाने चार ते पाच वाहनांना धडक दिल्याची घटना मंगळवारी घडली. कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाचे मोटार चालकाने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संजोग माने (वय २५) या मोटार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे वाहतूक विभागातील पोलीस शिपाई अमोल पिसाळ यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Today Pune Crime

Today Pune Crime : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर हे न्यायालयीन कामकाजासाठी मंगळवारी दुपारी वारजे परिसरातून निघाले होते. त्यावेळी वारजे एनडीए रस्त्याने प्रवासी वाहतूक करणारी मोटार भरधाव वेगात शिवणेकडे निघाली होती. त्यावेळी भरधाव मोटारीने पाच ते सहा वाहनांना धडक दिली. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पोलीस निरीक्षक क्षीरसागर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कर्मचाऱ्यांनी मोटार चालकाचा पाठलाग सुरू केला. वारजे चौकाजवळ मद्यधुंद मोटार चालकाने टेम्पोला धडक दिली. Today Pune Crime

पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी प्रसंगावधान राखून मोटार अडवली. त्यावेळी तेथे असणारे वारजे माळवाडी वाहतूक शाखेतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी घटनेची माहिती दिली. मोटार चालक मानेला ताब्यात घेऊन वारजे पोलीस चौकीत नेण्याच्या सूचना दिल्या. वाहतूक पोलीस मोटारीत बसले. तेव्हा चालकाने भरधाव वेगाने मोटार पोलीस चौकीकडे न नेता दुसऱ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. क्षीरसागर यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी मोटार काही अंतरावर अडवली. पोलिसांनी मोटार चालकाला चोप देऊन ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत चालकाने मद्यप्राशन केल्याचे दिसून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे तपास करत आहेत. Today Pune Crime

1 thought on “Today Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीचा कहर; सायबर फसवणूक, वाहन चोरी आणि मद्यधुंद चालकाचा थरार”

Leave a Comment