Mundhwa Magarpatta Road Waterlogging : मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावर कालवा फुटल्याने वाहतूक विस्कळीत

रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली; मुंढवा चौकात मोठी कोंडी

पुणे Mundhwa Magarpatta Road Waterlogging : हडपसर भागात कालवा फुटल्यानंतर मगरपट्टा- मुंढवा रस्त्यावरील भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून आले. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक पोलिसांनी तातडीने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. हडपसरमधील मगरपट्टा परिसरात कालवा फुटल्याने सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहून आले. पाण्याचे लोट रस्त्यावर आल्याने मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावर किमान एक ते दोन फूट पाणी साचले. सोलापूर, तसेच अहिल्यानगर रस्त्याने ये-जा करणारी वाहने मगरपट्टा-मुंडवा रस्त्याचा वापर करतात.. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Pune crime : नांदण्यास नकार दिल्याने संतप्त पतीकडून पत्नीची दुचाकी जाळली

Mundhwa Magarpatta Road Waterlogging त्यानंतर मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. ‘या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, मुंढवा चौकात वाहतूक कोंडी झाली आहे. या रस्त्यावर किमान दहा ते बारा तास पाणी राहण्याची शक्यता असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

वाहान चालकांसाठी पर्यायी मार्ग

Mundhwa Magarpatta Road Waterlogging : हडपसर वैदूवाडी चौक – शिंदे वस्ती, शिर्के कंपनी रस्ता, जहाँगीर नगर रस्ता, ताडीगुत्तामार्गे – मुंढवा चौक

२३ ॲव्हेन्यू माॅल, सोलापूर रस्ता काळूबाई मंदिर चौक – बी. टी. कवडे रस्ता – घोरपडी गाव – पिंंगळे वस्ती – ताडीगुत्ता चौक- मुंढवा चौक
खराडीकडून येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग – मुंढवा चौक – ताडीगुत्ता चौक- घोरपडी रेल्वे उड्डाण पूल – बी. टी. कवडे रस्ता – हडपसर

मुंढवा चौक – ताडीगुत्ता चौक – जहाँगीरनगर – शिर्के कंपनी – डाॅ. आंबेडकर चौक – शिंदे वस्ती – वैदूवाडी चौक – हडपसर
सोलापूर रस्त्याने येणारया वाहनांसाठी मार्ग – १५ नंबर चौक – मांजरी – झेड काॅर्नर – लोणकर वस्ती -केशवनगर – मुंढवा चौक

Leave a Comment