कल्याणीनगरमध्ये वेश्याव्यवसायावर छापा, लोहगावमध्ये तोडफोड; हडपसर व सायबर गुन्ह्यांत लाखोंची फसवणूक
पुणे – Pune Crime News Update : शहरातील कल्याणीनगर परिसरात मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेला वेश्या व्यवसाय पोलिसांनी उघड केला. कारवाईत एका आरोपीला अटक केली आहे. येरवडा पोलिसांनी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. ही कारवाई ईश्वरधाम अपार्टमेंट, जॉगर्स पार्कजवळील “निरा स्पा” मसाज सेंटरमध्ये ३१ मार्चला रात्री करण्यात आली. याप्रकरणी अरमान रहिमउद्दीन हुसेन (वय २१) याला अटक करण्यात आली असून, त्याच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे.
Ramtekdi Police Chowki : गुंडानो सावध रहा; सुधारणा न झाल्यास निघणार पोलीस काढणार तुमची धिंड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमताने मसाज सेंटरच्या नावाखाली संबंधित ठिकाणी कुंटणखाना चालवला होता. पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. तसेच, त्यांच्या कमाईवर उपजीविका करत त्यांचे लैंगिक शोषण करण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दर्शन देवगडे पुढील तपास करीत आहेत.
अल्पवयीनांकडून वाहनांची तोडफोड, लोहागाव मध्ये घडली घटना
पुणे- अल्पवयीन मुलांनी वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना लोहगाव परिसरात घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांवर हल्ला करत अज्ञात मुलांनी बेफाम तोडफोड केल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जे.पी. नगर, लेन क्रमांक पाच येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन टोळक्याने ज्येष्ठ नागरिकाच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर लोखंडी वस्तूने घाव घालून नुकसान केले. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इतर वाहनांचीही तोडफोड केली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी तीन ते चार अज्ञात मुलांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नाही. संबंधित मुलांनी वस्तीमध्ये येऊन कोणत्याही कारणाशिवाय वाहनांची तोडफोड केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. Pune Crime News Update
Pune Crime News Update : फुरसुंगी परिसरातही अल्पवयीनांकडून वाहनांची तोडफोड झाल्याची घटना नुकतीच घडली होती. सलग अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने अल्पवयीनांवर नियंत्रण ठेवण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरात अल्पवयीनांकडून वाढत्या बेशिस्त आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
केटरिंग कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक; कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
पुणे-सरकारी संस्थांमध्ये ओळख असल्याचे सांगत पुणे मध्यवर्ती कारागृहाचे केटरिंग कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार हडपसरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी संग्राम पांडुरंग वाघ (वय ३१, रा. कुमार पिकासो, डी.पी. रोड, हडपसर) यांनी तक्रार दिली असून, प्रविण बाजीराव कांबळे (रा. हिमालय सीएचएस, नवी मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. Pune Crime News Update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळेने तक्रारदाराशी ओळख वाढवून सरकारी संस्थांमध्ये मोठी ओळख असल्याचे भासवले. तसेच पुणे मध्यवर्ती कारागृहाचे केटरिंग कॉन्ट्रॅक्ट भागीदारीत घेण्याचा प्रस्ताव दिला. टेंडर भरल्यास कॉन्ट्रॅक्ट निश्चित मिळेल, तसेच आवश्यक सर्व परवानग्या आपल्या ओळखीमुळे सहज मिळतील, असे सांगून विश्वास संपादन केला. यानंतर आरोपीने तक्रारदाराकडून वेळोवेळी आरटीजीएस आणि रोख स्वरूपात ११ लाख रुपये उकळले. मात्र, कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. घेतलेली रक्कमही परत केली नाही. हा प्रकार आठ सप्टेंबर २०२३ ते २८ जून २०२५ या कालावधीत घडला आहे.याप्रकरणी १ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ५० लाखांची ऑनलाइन केली फसवणूक
पुणे- Pune Crime News Update : शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत आयटी व्यावसायिकाची तब्बल ४९ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार लोहगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमोल सुरेश चौधरी (वय ३५) यांनी तक्रार दिली असून, युट्युब लिंकद्वारे संपर्क साधणारे अज्ञात व्यक्ती तसेच शितल मोगल जगदाळे, हिमांश शर्मा आणि मंगल मोगल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३१ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदाराला शेअर ट्रेडिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगून विश्वासात घेतले. त्यानुसार तक्रारदाराकडून वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये ६३ लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. या गुंतवणुकीच्या बदल्यात आरोपींनी केवळ १३ लाख १५ हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित रक्कम परत न करता टाळाटाळ करत अखेरीस फसवणूक केल्याचे उघड झाले. पुढील तपास लोहगाव पोलिस करत आहेत. Pune Crime News Update
फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने ज्येष्ठाची १ कोटींची फसवणूक
Pune Crime News Update : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी कोंढवा परिसरातील ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह आयटी ऍक्टनुसार संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना आरोपींनी फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानुसार विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. दरम्यान, १९ ऑक्टोबर २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२६ कालावधीत तक्रारदाराकडून वेळोवेळी १ कोटी १ लाख ६१ हजार ८४५ रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेण्यात आले. मात्र, कोणताही परतावा न देता आरोपींनी फसवणूक केली. Pune Crime News Update
2 thoughts on “Crime News Update : पुण्यात गुन्हेगारीचा उच्छाद वाढला; स्पा रॅकेटपासून ते सायबर फसवणुकीपर्यंत धक्कादायक अनेक प्रकार उघडकीस”