Pune crime.. : पुण्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण; चोरी, मारहाण, बालविवाह आणि फरार गुंड अटकेत

संगमवाडीतील जबरी चोरी, स्वारगेटमधील पिस्तूलधारी हल्ला, बिबवेवाडीत बालविवाह उघड, तर ‘मकोका’ आरोपी बीडमधून जेरबंद

पुणे – Pune crime.. : शहरातील संगमवाडी परिसरात रिक्षातून आलेल्या तिघांनी लोखंडी हत्याराचा धाक दाखवत नागरिकाकडील रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याची घटना संगमवाडी पार्किंग क्रमांक ३ परिसरात घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सुरेश जावळकर (वय ५०, रा. लक्ष्मीनिवास बिल्डिंग, चंदननगर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

uterus removal surgery Maharashtra : गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात राज्यस्तरीय समितीची बैठक पडली पार

Pune crime..  : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळकर हे ३ एप्रिलला रात्री सव्वा आठ वाजता जेवणासाठी जात होते. त्यावेळी रिक्षातून आलेल्या तिघा आरोपींनी त्यांना अडवले. तुषार चव्हाण, रोशन पाटील आणि रोहन घोकशे (सर्व रा. संगमवाडी) या आरोपींनी लोखंडी हत्याराचा धाक दाखवत जावळकर यांच्याकडील १ हजार १०० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. याप्रकरणी ४ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीनगर पोलीस तपास करत आहेत.

मकोका’ कारवाईनंतर फरार; झालेला गुंड बीडमधून अटकेत

पुणे- Pune crime..  महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बीड जिल्ह्यातून अटक केली. कारवाईनंतर सराईत गेेले वर्षभर पोलिसांना गुंगारा देत होता. प्रथम नितीन मोहिते (वय २१, सध्या रा. शिवाजीनगर गावठाण, मूळ रा. खडकपुरा पेठ, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मोहिते याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी ‘मकोका’ कारवाई केली होती.

कारवाई केल्यानंतर तो पसार झाला होता. मोहिते याने मारहाण, धमकी देणे अशा प्रकारचे गु्न्हे फरार झाल्यानंतर केले होते. माेहिते हा बीड जिल्ह्यात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला बीड परिसरातून अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश माळगावे, पोलीस कर्मचारी रणजीत फडतरे, अमोल आवाड, मयूर भोकरे आणि पथकाने ही कारवाई केली. Pune crime..

बालविवाह प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

पुणे- शहरातील बिबवेवाडी भागातील एका १६ वर्षीय युवतीचा विवाह केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महिला आणि बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष हेल्पलाइन (१०९८) सुरू करण्यात आली आहे.

बिबवेवाडी भागातील अल्पवयीन युवतीचा विवाह करुन देण्यात आल्याची माहिती हेल्पलाइनवर मिळाली. त्यानंतर पर्यवेक्षिका मोनिका जाधव आणि पथकाने भेट दिली. चौकशीत अल्पवयीन मुलीचा विवाह करुन देण्यात आल्याची माहिती मिळाली. मुलीचे वय निश्चित करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला तपासण्यात आला. तेव्हा ती अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले. अल्पवयीन युवतीचा जाणीवपूर्वक विवाह करुन देण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील कलम ९, १० आणि ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी युवतीच्या नातेवाईकांची बाजू तपासली. त्यानंतर या प्रकरणात संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल माने तपास करत आहेत. ‘बालविवाहाचे प्रकार आढळून आल्यास त्वरीत विशेष हेल्पलाइन (१०९८) संपर्क साधावा’, असे आवाहन जिल्हा समन्वयक अली अख्तर अन्सार यांनी केले आहे. ‘माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे’, असे त्यांनी नमूद केले. Pune crime..

हातउसने पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण – स्वारगेट परिसरातील घटना; दोघे अटकेत

पुणे- हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून तिघांना मारहाण करण्यात आल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावरील धोबी घाट भागात घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांना अटक केली. याबाबत कानिफनाथ विष्णू नायडू (वय ५१, रा. सेवक मित्र मंडळाजवळ, कासेवाडी, भबानी पेठ) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी केलेल्या मारहाणीत नायडू आणि त्यांचे दोन भाचे जखमी झाले आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. Pune crime..

Pune crime..  : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नायडू आणि त्यांचे भाचे शंकरशेठ रस्ता परिसरातील धोबी घाट भागात असलेल्या स्मशानकाली मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्या वेळी नायडू यांनी आरोपींना दिलेले हातउसने पैसे परत मागितल्याने वाद झाला. त्यानंतर आरोपींनी नायडू यांच्या डोक्यावर शस्त्राने वार केला. नायडू यांच्याबरोबर असलेल्या भाच्यांनी मध्यस्थी केली. तेव्हा आरोपींनी नायडू आणि भाच्यांवर पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.

Leave a Comment