भवानी पेठेत तरुणाची हत्या; फुरसुंगीमध्ये तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करून दोघे जखमी, आरोपी ताब्यात
पुणे – Pune crime Batami : शहरातील हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात वैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले. याबाबत सक्षम शंकर जोगदंड (वय २२, रा. भेकराईनगर चौक, फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाेगदंड आणि त्याचा मित्र रजनीकांत पुजारी (वय १९, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) हे शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास भेकराईनगर परिसरात गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी अल्पवयीन युवक तेथे आला. त्याने जुन्या वादातून दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. युवकाने जोगदंड याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्या वेळी पुजारीने मध्यस्थी केली. अल्पवयीन युवकाने त्याचावर शस्त्राने वार केले. युवकान केलेल्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले. पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले असून, न्यायालयाच्या आदेशाने त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत. Pune crime Batami
पुण्यातील भवानी पेठेत वैमनस्यातून तरुणाचा खून; चौघे अटकेत
पुणे – Pune crime Batami : वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील काशेवाडी भागात घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी चौघांना अटक केली. अबूबकर अमजद खान (वय १८, रा. एडी कॅम्प चौक, नाना पेठ) असे् खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अम्मार शेख (वय १९, रा. चुडामण तालमीजवळ, भवानी पेठ), कमरअली सय्यद (वय १८, रा. विमाननगर), तुफेल सय्यद (वय १९), अबूझर कुरेशी (वय १८, रा. काशीवाडी, भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली. याबाबत अल्तमश अन्सार पिंजारी (वय १९, रा. मोमीनपुरा, घोरपडे पेठ) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune crime Batamiपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबूबकर आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. अबूबकर आणि त्याचे मित्र शनिवारी (११ एप्रिल) काशीवाडी भागातील त्रिकोणी उद्यानाजवळ रात्री साडेदहाच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. आरोपींनी अबूबकर आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना मारहाण केली. आरोपींनी अबूबकरवर शस्त्राने वार केले. अबूबकरला भोसकल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली.
गंभी जखमी झालेल्या अबूबकरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत. Pune crime Batami