Cyber Fraud : पुण्यात सायबर फसवणूक, लूट आणि अपघातांच्या घटनांत वाढ

जेष्ठ नागरिकांना लक्ष्य; ऑनलाईन गंडा, बतावणीने दागिने चोरी आणि दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

पुणे – Cyber Fraud : आधार कार्डचा गैरवापर करून तुमच्या नावाने दहशवाद्यांनी बँकखाते उघडले आहे. त्याद्वारे तब्बल ७० कोटींचा घोटाळा झाल्याची व्हिडिओ कॉलद्वारे बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला १८ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना ८ ते १५ एप्रिल २०२६ कालावधीत हडपसर परिसरातील काळेपडळमध्ये घडली आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CM Medical Assistance Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला डिजिटल बळ; रुग्णांसाठी जलद आणि पारदर्शक सेवा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे काळेपडळ परिसरात राहायला असून, ८ एप्रिलला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हिडिओ कॉल केला. तुमचे आधारकार्ड वापरून दहशतवाद्यांनी बँकखाते उघडल्याची बतावणी केली. त्यातून तब्बल ७० कोटींचा गैरव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये तुम्हाला अटक करण्याचे वॉरंट काढण्यात आल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला १८ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुतार तपास करीत आहेत.

जेष्ठाची २५ लाखांची फसवणूक

Cyber Fraud कंपनीचा मेलआयडी असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी हडपसर परिसरातील ७२ वर्षीय जेष्ठाला तब्बल २५ लाख ४२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ६ एप्रिल २०२६ रोजी हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील तपास करीत आहेत.

पोलीस असल्याच्या बतावणीने जेष्ठ महिलेला लुटले; पाषाणमधील रिलायन्स मार्टजवळील घटना Cyber Fraud

पुणे- पोलीस असल्याची बतावणी करीत दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी जेष्ठ महिलेकडील १ लाख ७० हजार रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना २१एप्रिलला सकाळी साडेआठच्या सुमारास पाषाणमधील रिलायन्स मार्टजवळ घडली आहे. याप्रकरणी ७५ वर्षीय महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार दोघा अज्ञात चोरट्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात आहे. Cyber Fraud

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला पाषाण परिसरात राहायला असून, २१ एप्रिलला सकाळी साडेआठच्या सुमारास मोरया रेसीडन्सीजवळून पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांना थांबवले. आम्ही पोलीस असून, पुढे काही महिलांकडील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहेत, असे सांगितले. तुमच्याकडील सोन्याचे दागिने कागदात सांभाळून ठेवा असे म्हणत चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादित केला. त्यानंतर चोरट्यांनी कागदात खोट्या अंगठ्या बांधून देत, हातचलाखीने महिलेकडील १ लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करीत आहेत. Cyber Fraud

महिलांनो सावधान, बतावणीला बळी पडू नका

एटीएम सेंटरमध्ये मदतीचा बहाणा करून हातचलाखी करणे, पोलीस असल्याची बतावणी करीत दागिने कागदात ठेवायला सांगणे, शेठजीला मुलगा झाला असून, मोफत साडी वाटपाचे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलांना लक्ष्य केले आहे. विशेषतः निमर्नुष्य ठिकाणांवर चोरट्यांकडून जेष्ठ महिलांना अडवून बतावणी करीत विश्वास संपादित केला जातो. त्यानंतर हातचलाखीने दागिने लंपास केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनो घरातील जेष्ठ महिलांना बाहेर पाठवण्याआधी काळजी घेणे गजरेचे आहे. Cyber Fraud

दुचाकी घसरल्याने अपघातात तरूण ठार, एकजण जखमी 

पुणे-भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू झाला आहे. अपघातात एकजण जखमी झाला असून, त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात २० एप्रिलला रात्री अकराच्या सुमारास विश्रांतवाडीजवळ फुलेनगर परिसरात घडला आहे. अजयकुमार डोमन मंडल (वय ३०, रा. येरवडा, मूळ-बिहार) असे ठार झालेल्याचे नाव आहे. सुजीत सहाणी (वय ३०, रा. विश्रांतवाडी ) असे जखमीचे नाव असून, त्याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयकुमार आणि सुजीत हे २० एप्रिलला रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून फुलेनगरातून प्रवास करीत होते. त्यावेळी अजयकुमार हा दुचाकी चालवित असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाल्याने दोघेही खाली पडले. वाहन चालक अजयकुमार गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत. Cyber Fraud

Leave a Comment