Ekvira Devi Chaitra Yatra 2026 : एकविरा देवी चैत्री यात्रेसाठी प्रतिबंधात्मक आदेश; वाहतूक वळविण्याचा निर्णय

२६ मार्चपर्यंत गडावर फटाके, वाद्ये, बळी यावर बंदी; कार्ला परिसरात वाहतुकीचे पर्यायी मार्ग लागू

पुणे Ekvira Devi Chaitra Yatra 2026 : पुणे ग्रामीण घटकातील लोणावळा ग्रामीण हद्दीत मावळ तालुक्यात मौजे वेहेरेगावी येथे होणाऱ्या श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ खाली २६ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केले आहे.

Pune Police : पुण्यात बेकायदा होर्डिंगविरोधात पोलिसांचा ‘पीटीपी’ अ‍ॅपचा वापर वाढणार

या कालावधीत शोभेची दारु, फटाके गडावर नेणे, गडावर फटाके वाजविणे, वाद्ये, ढोल, ताशे वाजविणे तसेच गडावर नेण्यास मनाई करण्यात येत आहे. एकाच प्रकार व रंगाची कपडे, वेशभुषा परिधान करणे, विशेषतः टी शर्ट वापरणे, कोंबडे, बकरी, पशु, पक्षी यांचा बळी न देणे व त्यांना मंदिरावर सोडणे, कार्लालेणी व परिसरातील ऐतिहासिक वास्तू व शिल्पांना हानी न पोहचविणे अथवा विद्रुपीकरण करण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ अन्वये तरतूदी व प्रचलित काद्यान्वये शिक्षेस पात्र राहिल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर वाहतूक वळविण्याचे आदेश जारी

Ekvira Devi Chaitra Yatra 2026  : पुणे ग्रामीण घटकातील लोणावळा ग्रामीण हद्दीत मावळ तालुक्यात मौजे वेहेरेगावी येथे होणाऱ्या श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २६ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केले आहे.

कार्ला फाटाकडून एकवीरा पायथा मंदीराकडे जाणारी वाहतूकीस मनाई करण्यात येत असून कार्ला फाटा ते एकवीरा पायथा मंदिर येथे जाणारी वाहने अग्रसेन हॉटेल वाहनतळ, लाजवंती महाविद्यालय वाहनतळ, दुर्गा परमेश्वरी वाहनतळ येथे लावण्यात यावी. Ekvira Devi Chaitra Yatra 2026

दिनांक २५ मार्चच्या मध्यरात्री 00.00 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जुना पुणे मुंबई महामार्गावरील वडगाव फाटा ते कुसगाव बु, टोलनाका दरम्यान जड वाहतूक बंद करण्यात येत असून वडगाव फाटा ते मुंबई-पुणे महामार्गाने कुसगाव बु. टोलनाका, मुंबई अशी वळविण्यात येत आहे. Ekvira Devi Chaitra Yatra 2026

जुना पुणे मुंबई महामार्गावरील कुसगाव बु, टोलनाका ते वडगाव फाटा दरम्यान जड वाहतूक बंद करण्यात येत असून कुसगाव बु. टोलनाका ते वडगाव फाटा मुंबई-पुणे महामार्गाने वडगाव फाटा, पुणे अशी वळविण्यात येत आहे. जड व अवजड वाहने (भाविकांची हलकी वाहने वगळून) सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.

Leave a Comment