Pune Crime News : पुण्यात बालविवाह रोखल्यानंतर अत्याचाराचा प्रकार उघड

बाणेर पोलिसांनी एकाला केली अटक

पुणे – Pune Crime News : बाल विवाह रोखल्यानंतर सासुरवाडीकडील मंडळी अल्पवयीन युवतीला पुन्हा सासरी घेऊन गेले. त्यानंतर युवती अल्पवयीन असल्याची माहिती असताना तरुणाने तिच्यावर अत्याचार केले. युवतीने याबाबत पोलिसंकडे तक्रार दिल्यानंतर बाणेर पोलिसांनी एकाला अटक केली.

Pune crime : नांदण्यास नकार दिल्याने संतप्त पतीकडून पत्नीची दुचाकी जाळली

‘चाईल्ड हेल्पलाइन’ या स्वयंसेवी संस्थेची मदत 

तक्रारदार युवतीचा विवाह एका तरुणाशी निश्चित करण्यात आला होता. युवती अल्पवयीन असल्याची माहिती सासरकडील मंडळींना होती. अल्पवयीन युवतीचा विवाह करण्यात येत असल्याची माहिती ‘चाईल्ड हेल्पलाइन’ या स्वयंसेवी संस्थेला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने विवाह रोखण्यात आला. नोव्हेंबर २०२५ मध्ये तरुणाच्या वडिलांनी युवतीला सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील घरी नेले. लोणंद येथे दोन महिने युवती राहिली. दरम्यान, बालविवाह रोखल्यानंतर युवतीला सासरकडील मंडळींनी पुन्हा नांदण्यास नेले असल्याची माहिती ‘चाईल्ड हेल्पलाईन‘ला मिळाली. स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्त्यांनी तिची तेथून सुटका केली. त्यानंतर युवतीची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत युवतीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

Pune Crime News : युवती अल्पवयीन असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. त्यानंतर युवतीने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) २२ वर्षीय तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शैला पाथरे तपास करत आहेत.

Leave a Comment