स्वारगेट मेट्रोसमोर पीएमपी धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; बालेवाडी, कर्वे रस्ता व कोंढवा परिसरात लाखोंच्या चोरीचे गुन्हे दाखल
पुणे – Crime News : रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा पीएमपीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुुरुवारी रात्री स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी रात्री उशीरा पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कात्रजहून स्वारगेटकडे निघालेली पीएमपी बस स्वारगेट मेट्रो स्थानकासमोरुन निघाली होती. त्या वेळी पादचारी रस्ता ओलांडता होता. पीएमपीच्या चाकाखाली पादचारी सापडल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी पीएमपी चालकाला ताब्यात घेतले. चैाकशीत पादचारी रस्ता ओलांडत असातना पळत होता. अचानाक पीएमपी बसच्या मागच्या चाकाखाली तो सापडला, अशी माहिती पीएमपी चालकाने पोलिसांना दिली.
पोलिसांनी स्वारगेट परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. स्वारगेट भाग गजबलेला असतो. स्वारगेट परिसरात पीएमपी, मेट्रो, तसेच एसटी स्थानक आहे. याभागात प्रवाशांची मोठी गर्दी असते.
खासगी विद्यापीठात चोरी प्रकरणी गुन्हा
पुणे- बालेवाडीतील निकमार युनिव्हर्सिटी या संस्थेतील प्रयोगशाळेतून संगणक आणि लॅपटाॅप असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी एकाविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला अहो. याबाबत संस्थेतील कर्मचारी विशाल तळेकर (वय ३७, रा. देशमुखवाडी, शिवणे, वारजे -एनडीए रस्ता) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी परिसरात निकमार युनिव्हर्सिटी आहे. या संस्थेतील प्रयोगशाळा आणि सर्व्हररुमधील लॅपटाॅप आणि संगणक चोरून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार आहेर तपास करत आहेत.
कर्वे रस्त्यावर ओैषध विक्री दुकानातून रोकड चोरी
ओैषध विक्री दुकानातून रोकड चोरीला गेल्याची घटना कर्वे रस्ता भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ओैषध विक्रेत्याने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Crime News
Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रस्ता परिसरात ओैषध विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यातून १६ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून ओैषध, किराणा माल, तसेच मिठाई विक्री दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. Crime News
कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेत चोरी
Crime News पुणे-कोंढव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंट (एनआयबीएम) संस्थेच्या आवारात शिरलेल्या चाेरट्यांनी एक लाख १० हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बळीराम पवार (वय ३३, रा. एनआयबीएम कर्मचारी वसाहत, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिग मॅनेजमेंट ही संस्था आहे. बँकिंग प्रशिक्षणाविषयी या संस्थेचा नावलौकिक आहे. या संस्थेचे आवार प्रशस्त आहे. संस्थेच्या आवारात चोरटे शिरले. चोरट्यांनी संस्थेच्या आवारातील स्टोअर रुमचे कुलूप तोडले. चोरट्यांनी स्टोअर रुममधून एक लाख १९ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी संस्थेच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक झाडे तपास करत आहेत. Crime News