crime update Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट; खून, जबरी चोरी, गोळीबार, सायबर फसवणुकीच्या घटना उघड

अल्पवयीनांकडून गोळीबार, ज्येष्ठांना लक्ष्य; बनावट कागदपत्रे, ऑनलाइन गंडा व धमक्यांचे प्रकार समोर

पुणे – crime update Pune  : शेतातील घरात झोपलेल्या जेष्ठाच्या डोक्यात लोखंडी पहार मारून खून करीत जबरी चोरी करणार्‍या सराईताला स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी अटक केली आहे. त्यासोबतच जबरी चोरी करणार्‍या दोन टोळीतील चौघांना बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर उपस्थित होते.

Pune Grand Tour 2027 : पुणे जिल्ह्यात ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ सायकल स्पर्धेची घोषणा; 26 ते 31 जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांत रंगणार

crime update Pune आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे पानईमळा परिसरात जेष्ठ शेतकरी दामोदर जयराम मिंडे (वय ६२) हे ३१ मार्चला रात्रीच्या सुमारास शेतातील घरात झोपले होते. त्यावेळी दरोड्याच्या उद्देशाने आरोपींनी त्यांच्या डोक्यात पहारेने मारून खून करीत २९ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीचा माग काढण्यास गती दिली. आरोपींनी दुचाकीवर प्रवास केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथकाने ६० किलोमीटर परिसरातील १०० सीसीटीव्हींचे फुटेज तपासले. संबंधित दुचाकी आरोपी कबीर काळे याची असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने कबीर उंबर्‍या काळे (वय २४ रा. सुरेगाव, श्रीगोंदा, अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले.

तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपी कबीर काळेविरूद्ध ९ गंभीर गुन्हे दाखल असून, तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याच्याकडून आणखी चार गुन्ह्याची उकल केली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, एपीआय महादेव शेलार, एपीआय सुनील बडगुजर, उपनिरीक्षक सुनील धनवे, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, दीपक साबळे, अक्षय नवले, नीलेश सुपेकर, मंगेश थिगळे, सुजाता कदम, संजय नाडेकर, योगेश रोडे यांनी केली आहे. crime update Pune

दोन टोळ्यातील चार सराइतांना अटक

शिरूर शहरात जबरी चोरी करणार्‍या दोन टोळीतील चार सराईतांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी महिलेच्या गळ्यातील ३ लाखांचे दागिने हिसकावले होते. तर वेल्हे परिसरात दोन चोरट्यांनी एकाला मारहाण करून डोळ्यात मिरचीपूड फेकून १८ तोळे लुटले होते. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने १४५ किलोमीटरवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला. अनिल गोरखनाथ मस्के (वय ३३ रा. पिंपरी-िंचचवड) आणि अभिजीत सुभाष रॉय (वय २६ रा. चिखली ) या सराईतांना अटक केली. वेल्ह्यातील गुन्ह्यात अभिषेक सचिन खुटवड (वय २३) आणि प्रसाद सतीश शिंदे (वय २१ रा. वेल्हे ) यांना अटक केली. संबंधित आरोपींकडून १ लाख ९४ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अक्षीक्षक रमेश चोपडे, प्रशांत ढोले, पीआय प्रमोद क्षीरसागर, संदेश केंजळे, एपीआय दत्ताजीराव मोहिते यांनी केली.

कुत्र्याला मारहाण; विरोध केल्यावर दांपत्याला धमकी

पुणे- crime update Pune  भटक्या कुत्र्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा धक्कादायक घटना मांजरी परिसरात घडली आहे. या घटनेला विरोध करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करत धमकावल्याचाही प्रकार घडला असून, याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दत्ता शिंदे (वय ३५, रा. आराध्या रेसिडन्सी, देवनगरी कॉलनी, शिवराज हॉटेलजवळ, झेड कॉर्नर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. ही घटना ५ एप्रिलला रात्री पावणे अकराच्या घडली आहे. crime update Pune

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मुलीकडे भटके कुत्रे धावून आल्याच्या कारणावरून आरोपीने संतापाच्या भरात त्या कुत्र्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे कुत्रा बेशुद्ध पडल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेदरम्यान तक्रारदारांनी जाब विचारला असता आरोपीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच तक्रारदार महिलेशी अश्लील वर्तन करत ‘तुलाही मारून टाकीन’ अशी धमकी देत तिच्या अंगावर धावून गेला. यावेळी तक्रारदाराच्या पतीलाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणात आरोपीविरुद्ध मारहाण, धमकी तसेच प्राण्यांवरील क्रूरतेसंदर्भातील कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे

बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर नोकरी’ आरोग्य विभागात फसवणुकीचा गुन्हा

crime update Pune पुणे-बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून राज्य सरकारची नोकरी मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधिताने खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरोग्य सेवा (परिवहन) विभागात नियुक्ती मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात राम भाऊसाहेब पाटील (वय २८, रा. मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासकीय अधिकारी सीमा भैरवनाथ हुलगे (वय ५७) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार ३० जानेवारी २०२५ ते २३ जुलै २०२५ या कालावधीत उपसंचालक आरोग्य सेवा (परिवहन) पुणे यांच्या कार्यालयात घडला. crime update Pune

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पाटील याने दिव्यांग प्रमाणपत्र अनधिकृतरीत्या मिळवून ते सरकारकडे सादर केले. या प्रमाणपत्राच्या आधारे त्याने कार्यदेशक (गट-क) पदावर आरोग्य सेवा (परिवहन) विभागात नोकरी मिळवली. दरम्यान, संबंधित प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी उपसंचालक कार्यालयाकडून धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला. त्या वेळी आरोपीनेच बनावट पत्र तयार करून प्रमाणपत्र वैध असल्याचा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झालेcrime update Pune

तसेच, ‘MH0230019970241465’ (१३ डिसेंबर २०२२) क्रमांकाचे दिव्यांग प्रमाणपत्र वैध असल्याचे खोटे दाखवत कार्यालयात सादर करण्यात आले होते. या प्रकारामुळे सरकारची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस पुढील तपास करत आहेत.

चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी; पुणे स्टेशन परिसरातील घटना; ८१ हजारांसह ऐवज लंपास

पुणे- crime update Pune रेल्वे स्थानकाच्या परिसरात चाकूचा धाक दाखवत दोन तरुणांकडून रोख रक्कम, मोबाइल आणि सोन्याची अंगठी लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धीरजसिंग नारायणसिंग राजपूत (वय २९, रा. अथर्व अपार्टमेंट, विद्युत कॉलनी, जळगाव) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. ही घटना ५ एप्रिलला सकाळी पावणेबाराच्या सुमारास पुणे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या मागील मोकळ्या जागेत घडली. crime update Pune

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांचा मित्र हे स्टेशन परिसरात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. आरोपींनी चाकूचा धाक दाखवत धमकावण्यास सुरुवात केली. ‘पैसे आणि मौल्यवान वस्तू द्या, अन्यथा जीवे ठार मारू’ अशी धमकी देत त्यांनी जबरदस्तीने दोघांकडील मोबाइल, ८१ हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी हिसकावून घेतली. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.

पीपीएफ स्टेटमेंटच्या बहाण्याने लिंक पाठवून फसवणूक; ज्येष्ठ महिलेचे १४.५ लाख लंपास

पुणे-पीपीएफ खात्याचे स्टेटमेंट मिळवून देण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून मोबाइल हॅक करत ज्येष्ठ नागरिक महिलेची १४ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. औंध परिसरात राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. हा प्रकार सात एप्रिलला घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आपल्या घरी असताना पंजाब नॅशनल बँकेच्या कॅम्प शाखेतील पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) खात्याचे स्टेटमेंट मिळवण्यासाठी त्यांनी गुगलवरून मिळालेल्या एका अनोळखी क्रमांकावर संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने स्वतःचे नाव अजय कुमार असे सांगून व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे संवाद साधला. crime update Pune

आरोपीने स्टेटमेंटच्या नावाखाली एक लिंक पाठवून ती उघडण्यास सांगितले. लिंक उघडल्यानंतर इंटरनेट आणि सर्व्हर समस्या असल्याचा बनाव करण्यात आला. प्रत्यक्षात त्या लिंकद्वारे तक्रारदाराचा मोबाइल हॅक करण्यात आला. या प्रक्रियेतून आरोपींनी त्यांच्या खात्यातील १४ लाख ५० हजार रुपये काढून घेत आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणात संबंधित मोबाइल क्रमांकधारक, व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते तसेच बँक खात्यांचे धारक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास चतुश्रृंगी पोलिस करत आहेत.crime update Pune

अतिरेक्यांकडे मोबाइल क्रमांक सापडल्याची बतावणी; पुण्यात महिलेला ९७ लाखांचा गंडा 

पुणे- पोलीस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एका महिलेला तब्बल ९७ लाखांचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मोबाइल क्रमांक जम्मू-कश्मीरातील पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत सापडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बँकखाते तपासणीच्या नावाखाली महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना २७ मार्च ते ७ एप्रिल २०२६ कालावधीत कॅम्पमध्ये घडली आहे. याप्रकरणी ५४ वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.crime update Pune

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कॅम्प परिसरात राहायला असून, २७ मार्चला सायबर चोरट्याने त्यांना फोन करून पोलीस अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली. तक्रारदार महिलेच्या नावावर असलेला मोबाइल क्रमांक जम्मू कश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेला बँकखाते तपासणीसाठी डिटेल्स मागवून घेतले. त्यांचा विश्वास संपादित करून तक्रारदार महिलेला ९७ लाख रूपये वर्ग करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करीत आहेत.crime update Pune

पीएफ अकाउंट तपासणी पडली १४ लाख ५० हजारांना

पीएफ अकाउंटची तपासणी करणे एका जेष्ठ महिलेला चांगलेला महागात पडले आहे. महिलेने गुगलद्वारे संपर्क क्रमांक शोधून त्यावर फोन लावला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेला व्हॉटसअ‍ॅप कॉलद्वारे संभाषण करीत स्टेंटमेंट पाठवून दिले. लिंक उघडण्यास समस्या असल्याचे सांगून मोबाइलचा अ‍ॅक्सेस घेत सायबर चोरट्यांनी महिलेची १४ लाख ५० हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना ७ एप्रिल २०२६ रोजी औंधमध्ये घडली असून, ६५ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. crime update Pune

पुण्यात अल्पवयीन मुलावर गोळीबार, टोळके ताब्यात

पुणे- crime update Pune शहरातील सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलावर गोळीबार केल्याची घटना घडली.धक्कादायक म्हणजे, १७ वर्षीय मुलावर गोळीबार केल्यानंतर दहशत माजविण्यासाठी हवेत देखील गोळीबार करण्यात आला. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या या सर्व अल्पवयीन मुलांना पकडले आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात पाच जणांना ताब्यात घेतले आहेत. याबाबत १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा सर्व प्रकार मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास चरवडवस्ती येथील मैदानावर घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी अल्पवयीन असले तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. जखमी मुलावर तीन गुन्हे नोंद आहेत. तर, आरोपींमधील काहींवर पहिले गुन्हे आहेत. दरम्यान, यातील दोन्ही मुलांच्या वडगाव बुद्रुक परिसरात स्वतंत्र टोळ्या (गट) आहेत. त्यामुळे त्यांच्यात वादविवाद असतात. काही महिन्यांपुर्वी त्यांच्यात वाद झाले होते. या वादातूनच पाच जणांनी चरवडवस्ती येथील मोकळ्या मैदानावर मुलगा मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना त्यांना थांबविले. शिवीगाळकरत तुमचा विषयच संपवतो, असे म्हणत लोखंडी हत्याराने वार केले. crime update Pune

त्यानंतर यातील एकाने थेट पिस्तूल काढून या मुलावर गोळी झाडली. गोळी मुलाच्या मांडीत लागली. तो गंभीर जखमी झाला. तो कोसळल्यानंतर या भागात दहशत माजविण्यासाठी या टोळक्याने हवेत देखील गोळीबार केला. त्यानंतर टोळके पसार झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी पसार झालेल्या मुलांचा शोध सुरू केला. त्यांना बुधवारी रात्री पकडण्यात आले. त्यांनी हे पिस्तूल कोणाकडून आणले, त्याचा आणखी कुठे वापर केला आहे का, यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विनायक पाटणकर, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

मनी लॉड्रींगच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; जेष्ठेला ९ लाखांचा गंडा

पुणे- मनी लॉड्रींगच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देउन सायबर चोरट्यांनी एका जेष्ठ महिलेला तब्बल ९ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३१ मार्च ते २ एप्रिल कालावधीत कोंढवा खुर्दमध्ये घडली आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला कोंढवा खुर्द भागात राहायला असून, ३१ मार्चला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. पोलीस असल्याची बतावणी करीत दहशतवाद्यांच्या यादीत महिलेचे नाव असल्याचे सांगितले. तसेच मनी लॉड्रींगच्या नावाखाली अटक करण्याची भीती दाखवून तब्बल ९ लाख रूपये वर्ग करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करीत आहेत. crime update Pune

शेअरमध्ये गुंतवणूूकीच्या आमिषाने फसवणूक

शेअरमार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाला ९ लाख ४१ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १० ते ३० ऑक्टोबर २०२५ कालावधीत मांजरी रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी तरूणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत.

Leave a Comment