cyber fraud Pune : पुण्यात अपघात आणि सायबर फसवणुकीच्या घटनांत वाढ

संगमवाडीत पादचाऱ्याचा मृत्यू; ज्येष्ठ नागरिकांना लाखोंचा गंडा

पुणे – cyber fraud Pune : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी आराम बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना संगमवाडी येथील प्रवासी बस थांब्यावर घडली. या प्रकरणी प्रवासी बस चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रज्जू निषाद (वय ३९, रा. छत्तीसगड) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत बुधारु रामजी निषाद (वय ३५, सध्या रा. हिंजवडी) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीचा वाढता विळखा; गोळीबाराचा प्रयत्न, सायबर फसवणूक आणि घरफोडीच्या घटनांनी खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निषाद यांचा भाऊ रज्जू हे संगमवाडी परिसरातून २३ मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसच्या थांब्याजवळ एक बसने रज्जू निषाद यांना धडक दिली. बसच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता बस चालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या निषाद यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. cyber fraud Pune

अपघातानंतर पसार झालेल्या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विभुते तपास करत आहेत. संगमवाडी परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे (ट्रॅव्हल्स) थांबे आहेत. संगमवाडी ते येरवडा रस्त्यावर यापूर्वी प्रवासी बसच्या धडकेत पादचारी, दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत.

भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक

पुणे- cyber fraud Pune मोबाइलवरील गेम जिंकल्याने भेटवस्तू देण्यात येणार असल्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. cyber fraud Pune

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे धनकवडी भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या माेबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मोबाइलवरील गेम जिंकल्याने तुम्हाला महागड्या भेटवस्तू पाठविण्यात येणार आहेत. महागडा मोबाइल संच, चामड्याची पिशवी अशा भेटवस्तू पाठविण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून चोरट्यांनी त्यांना भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले. तक्रारदार ज्येष्ठाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक लोंढे तपास करत आहेत. cyber fraud Pune

गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीतीने ज्येष्ठाची साडेआठ लाखांची फसवणूक

पुणे-सायबर चोरट्यांनी गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून कोथरूड भागाातील एका ज्येष्ठ नागरिकाची आठ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, तक्रारदार ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथरूडमधील महात्मा सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. गॅस देयक थकीत असून, पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली. गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवावे लागतील, अशी बतावणी चोरट्यांनी केली.

cyber fraud Pune त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली. ही लिंक उघडताच चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलचा ताबा घेतला. मोबाइल क्रमांक ‘हॅक’ केला. मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात असल्याने चोरट्यांनी बँक खात्यातील आठ लाख ५१ हजार रुपयांची रोकड दुसऱ्या एका खात्यात जमा करुन घेतली. खात्यातून पैसे काढण्यात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत. चार दिवसांपूर्वी शिवाजीनगर भागात माॅडेल काॅलनीत राहणाऱ्या एका नागरिकाची सायबर चोरट्यांनी गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून चार लाख रुपयांची फसवणूक केली होती. गॅस, वीज पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोेलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment