Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीचा वाढता विळखा; गोळीबाराचा प्रयत्न, सायबर फसवणूक आणि घरफोडीच्या घटनांनी खळबळ

फलक वादातून हल्ला, बिटकॉइन व शेअर गुंतवणुकीत लाखो-कोटींची फसवणूक; कोथरुड-कोंढव्यात चोरीच्या घटनांची मालिकाच

पुणे – Pune Crime News  : शहरातील महात्मा फुले पेठेत (गंज पेठ) श्री हनुमान जन्मोत्सवाचा फलक लावण्याच्या वादातून टोळक्याने तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. स्वप्नील सुनील पाटणकर (वय २२, रा. महात्मा फुले स्मारकाजवळ, महात्मा फुले पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. पाटणकर याने याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनिश धडे, ओम लोंढे, सुलतान सय्यद, चैतन्य उर्फ सार्थक शिवपावय, मितेश विनोद माने, सार्थक गावडे, वरद महेंद्र कांबळे, महेंद्र उर्फ वास्को रामचंद्र कांबळे यांना अटक करण्यात आली.

Pune Anti Drug Campaign : पुण्यात ड्रग्जविरोधी मोहिमेला वेग; नगरसेवकही आता मैदानात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (२५ मार्च) मध्यरात्री एकच्या सुमारास पाटणकर आणि त्याचा मित्र महात्मा फुले पेठ परिसरात श्री हनुमान जन्मोत्सवाचे फलक लावत होते. त्या वेळी आरोपींशी पाटणकर आणि त्याचा मित्राचा वाद झाला. आरोपी सुलतान सय्यद याने त्याच्याकडील पिस्तूल काढले. पाटणकरवर पिस्तूल रोखून त्याने चाप ओढला. मात्र, पिस्तुलातून गोळी सुटली नाही. पाटणकर याच्याबोबर असलेले मित्र आदित्य, अथर्व आणि आदेश यांना पट्ट्याने मारहाण केले. पाटणकर याच्या डोक्यात पिस्तुलाचा दस्ता मारल्याने तो जखमी झाले.

Pune Crime News : आरोपींनी पाटणकर आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना दगड, तसेच बाटल्या फेकून मारल्या. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कुरुनुर तपास करत आहेत.

बिटकॉइन गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाख ४८ हजारांची फसवणूक

Pune Crime News : अधिक परताव्याचे आमिष दाखवत बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून महिलेची ११ लाखांहून अधिक रकमेची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २३ मार्च २०२४ ते २८ मार्च २०२४ या कालावधीत घडला. याबाबत कोंढवा बुद्रुक येथील ४४ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी टेलीग्राम ग्रुपच्या माध्यमातून तक्रारदाराशी संपर्क साधला. बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करून घेण्यात आले. काही दिवसांनी अपेक्षित परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारात एकूण ११ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने १५ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक व व्यवसायाच्या नावाखाली विश्वास संपादन करून १५ लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचा प्रकार येरवडा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. ही घटना १३ सप्टेंबर २०२५ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत कल्याणीनगर येथील ग्राफिकॉन कोर्ट परिसरात घडली. याबाबत कल्याणीनगर येथील ४२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी उर्फ किरण महाडीक (रा. दादर, मुंबई) आणि राजश्री चिखले यांनी संगनमत करून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. शेअर मार्केट ट्रेडिंग व व्यवसायासाठी ‘स्टॅम्प ड्युटी’ भरण्याचे आमिष दाखवत त्यांनी वेळोवेळी पैसे मागितले. तक्रारदाराने आरोपींच्या सांगण्यावरून विविध बँक खात्यांमध्ये रक्कम जमा केली. मात्र, अपेक्षित परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

जेष्ठाला जादा परताव्याचे आमिष पडले १ कोटींना

Pune Crime News : शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी तीन लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. Pune Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २८ नोव्हेंबर २०२५ ते १६ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडला. याबाबत कोंढवा एनआयबीएम रस्त्यावरील ६३ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदार महिलेला युट्युब चॅनलवरील व्हिडिओच्या माध्यमातून तक्रारदाराशी संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी लिंक पाठवून संबंधित ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले. या ॲपच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. अधिक नफ्याच्या आशेने तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली. मात्र, नंतर हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आले. या प्रकरणातील आरोपींची ओळख अद्याप पटलेली नसून, सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे. Pune Crime News

Leave a Comment