Pune Anti Drug Campaign : पुण्यात ड्रग्जविरोधी मोहिमेला वेग; नगरसेवकही आता मैदानात

‘माझा प्रभाग ड्रग्जमुक्त’ उपक्रमाची सुरुवात; चार प्रभागांत पायलट प्रोजेक्ट, नागरिकांसाठी विशेष अ‍ॅपही लवकरच

पुणे – Pune Anti Drug Campaign : अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, आता नगरसेवकांनाही उपक्रमात जोडण्यात आले आहे. ‘माझा प्रभाग ड्रग्ज मुक्त’ उपक्रमाद्वारे ड्रग्ज विक्रीला लगाम घातला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्यांदा चार प्रभागात उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. संबंधित भागात ड्रग्ज विक्री, तस्करांविरूद्ध पोलिसांसह नगरसेवक जबाबदारीने काम करणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

Pune Crime News : पुण्यात बालविवाह रोखल्यानंतर अत्याचाराचा प्रकार उघड

शहरात मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थ तस्करी वाढल्याचे दिसून आले आहे. विशेषतः देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटही उघडकीस आली आहेत. त्यापार्श्वभूमीवर अमली तस्करांची पुरवठा साखळी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार आता नगरसेवकही ड्रग्ज मुक्त प्रभाग करण्यासाठी सहभागी होणार आहेत. प्रभाग मुक्त ड्रग्ज असा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रायोगित तत्त्वावर पहिल्या टप्यात चार प्रभागात हा उपक्रम राबवून येथे ड्रग्जची विक्री, बाळगणे किंवा तो कोण-कोण पितो, यासंदंर्भात माहिती ठेवून पोलिसांसोबत ते उघड करणार आहेत.

पीटीपी अ‍ॅपप्रमाणेच ड्रग्जचेही अ‍ॅप

वाहतूक नियम भंगाचे फोटो पाठविण्यासाठी पुणे पोलिसांनी विकसित केलेल्या पीटीपी अ‍ॅपच्या धर्तीवर आता ड्रग्ज विरोधीही अ‍ॅप तयार केले जाणार आहे. ज्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिक थेट फोटो, व्हिडीओ व लोकेशन पोलिसांना पाठवू शकणार आहेत. विशेष म्हणजे, माहिती पाठविणार्‍याची माहिती अत्यंत गुप्तता पाळली जाणार आहे. जेणेकरून ड्रग्जला ब्रेक लागणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज पाहिले जाणार आहे. Pune Anti Drug Campaign

अँटी ड्रग्जविरोधी पथक ड्रग्ज मुक्तीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात अँटी ड्रग्जविरोधी पथक स्थापन केले जाणार आहे. ते फक्त ड्रग्ज विरोधात कारवाई करणार आहे. पहिल्या टप्यात शहरातील ठरावीक १० पोलिस ठाण्यात स्कॉडची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर शहरातील ४४ पोलिस ठाण्यात हे पथक स्थापन केले जाणार आहे. त्यामुळे ड्रग्ज तस्करांविरूद्धची मोहिम फत्ते करण्यासाठी नगरसेवकांचा पुढाकार महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे. Pune Anti Drug Campaign

Leave a Comment