Pune Crime News : पुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी चोरी; पोलीस करत कसून तपास
पुणे – Pune Crime News Update : पुणे शहरांमध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत असताना त्यामध्ये आणखी एका चोरीच्या घटनेची भर पडली आहे. शहरातील हडपसर परिसरातील एका सराफी पेढीतून चोरट्यांनी ९८ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका सराफ व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune ACB trap : पुण्यात लाच घेताना वनक्षेत्र ‘सर्व्हेअर’ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले
Pune Crime News Update : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सराफ व्यावसायिक हे सदाशिव पेठेतील विजयानगर काॅलनीत राहायला आहेत. हडपसरमधील मगर आळीत त्यांची सराफी पेढी आहे. सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी सराफी पेढीचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. सराफी पेढीत चार चोरटे शिरले. चोरट्यांनी सराफी पेढीतून सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसंनी सराफी पेढीतील चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक फिरोज मुलाणी तपास करत आहेत.
पुण्यात रविवार पेठेत महिलेच्या पिशवीतून रोकड चोरी
पुणे – Pune Crime News : खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी ४२ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना रविवार पेठेत घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मारला डल्ला
Pune Crime News Update : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरात राहायला आहेत. त्या रविवार पेठेतील कापडगंज परिसरात साेमवारी (३० मार्च) दुपारी खरेदीसाठी आल्या होत्या. चोरट्यांनी गर्दीत त्यांच्या पिशवीतून ४२ हजारांची रोकड चोरून नेली. रोकड चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी कापडगंज परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत. आठवड्यापूर्वी तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून दीड लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे पोलीस देखील हतबल झाल्याचे पाहिला मिळत आहे. पुण्यामध्ये अनेक भागांमध्ये नागरिकांमध्ये दहशत पसरलेली आहे. Pune Crime News Update